मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तिसऱ्या यादीत सेनेचे 13 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजपच्या शायना एनसी यांचं सेनेच्या तिसऱ्या यादीत आलं आहे. पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा मुळशी या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने उमेदवारी घोषित होण्याची अपेक्षा असताना अचानक या विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्येही नसल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येईल. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागा या शिवसेना पक्षाच्या तर्फे लढवल्या जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत असून याबाबत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या मित्र पक्षांनी त्यास संमतीही दिली असल्याची माहिती आहे. मुळात शिवसेनेकडे वाट्याला आलेल्या दोन विधानसभा मतदारसंघात किमान एक विजय मिळावा यासाठी पक्षाच्या वतीने व्यूहरचना करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाकडे कोणता पर्याय नाही आणि जेष्ठ नेतृत्वाला नाराज करणे शक्य नाही त्यामुळे पुणे जिल्ह्यात विजयश्री खेचण्यासाठी भोर वेल्हा मुळशीतील सर्व इच्छुकांची चाचपणी पक्षाकडून केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या दोन नेतृत्वांनी गेली दोन वर्ष हा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत या भागामध्ये बांधणी केली आहे परंतु गणिते जुळवत विजयी किरणोदय गाठण्यासाठी शिवसेनेने नवी शखल लढवली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार-
सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर
घनसावंगी- हिकमत उढाण
कन्नड- संजना जाधव
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर – मल्हारी कांबळे
नेवासा- विठ्ठल लंघे पाटील
धाराशिव- अजित पिंगळे
करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राऊत
गुहागर- राजेश बेंडल
पाठिंबा- जनसुराज्य
हातकणंगले- अशोकराव माने
राजश्री शाहू विकास आघाडी
शिरोळ- राजेंद्र यड्रावकर
शायना एनसी, रावसाहेब दानवेंच्या लेकीला उमेदवारी
भाजप नेत्या शायना एनसी वरळी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळीत मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर शायना एनसी यांना शिवेसनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव हिनं काल शिवसेनेत प्रवेश केला होता. तिला देखील कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
बार्शीमधील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे समर्थक मानले जातात. मात्र, जागा वाटपामध्ये बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानतंर राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या ठिकाणी शिवसेनेकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोल्हापूरमधील दोन जागांवर मित्रपक्षांना पाठिंबा
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये हातकणंगलेच्या जागेवर जनसुराज्य पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. भाजपनं देखील शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिरोळ मतदारसंघात राजेंद्र यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शिवसेनेकडून 78 जागी उमेदवार तर दोन जागा मित्रपक्षांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेककडून पहिल्या यादीत 45, दुसऱ्या यादीत 20 आणि तिसऱ्या यादीत सेनेचे 13 आणि मित्रपक्षांचे 2 असे उमेदवार जाहीर केले आहेत. म्हणजेच शिवसेना 78 आणि मित्रपक्ष 2 जागा लढवणार आहेत.
महायुतीकडून भाजपनं 146 आणि मित्रपक्ष 4 अशा 150 एकनाथ शिंदे यांची शिवसेना 78 आणि मित्रपक्षांचे 2 अशा 80 जागा जाहीर केल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 49 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.