लगेच करा ‘हा’ सोपा चायनीज उपाय, फुप्फुसं होतील साफ!
सध्या वातावरण बदलामुळे सर्दी-खोकल्याची समस्या अचानक वाढत आहे. या दिवसांमध्ये अनेकांना कफाची समस्या होते. अनेकांच्या छातीत कफ जमा झाल्याने खोकला येतो. यावर लोक वेगवेगळी औषधंही घेतात.पण अनेकदा औषधांनीही काही फरक पडत नाही. अशात छातीत जमा झालेला कफ बाहेर करण्यासाठी एक अनोखा उपाय आम्ही सांगणार आहोत.
एक्यूपंक्चरच्या मदतीने तुम्ही छातीत जमा कफ बाहेर काढू शकता. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला फार काही करायचं देखील नाही. एक सोपी ट्रिक करायची आहे. प्रदुषण, कफ, इन्फेक्शनमुळे फुप्फुसं कमजोर होतात किंवा ब्लॉक होतात. ज्यामुळे मोकळेपणाने खोकताही येत नाही आणि कफही बाहेर येत नाही. खोकला झाला की, घशातही वेदना होते. या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी एक्यूपंक्चरची मदत घेऊ शकता. चीनमध्ये फार पूर्वीपासून हा उपाय केला जातो.