मुंबई दि. १७ (रामदास धो. गमरे) समता सेवाभावी संस्था (रजि.) संलग्न समता मित्रमंडळ, कोरबा मिठागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वडाळा (पूर्व), मुंबई-३७ या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाला पूज्य भन्ते संघ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता त्यासोबतच समता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीपराव लहासे, कुमार लिंगाडे, राजू खंडागळे, रतन गाडे, विजय साळवे, प्रमोद गायकवाड, प्रेम लहासे, योगेंद्र गायकवाड, नगरसेविका पुष्पा कोळी, सुहास भादवे, राहुल लहासे, रोहिदास निकाळजे, मयूर शिंदे, मंगेश डोंगरे, संदीप खंडागळे, सुमित लहासे, योगेश डोंगरे आदी मान्यवर त्याप्रमाणे विभागातील विविध धार्मिक, राजकीय, सामाजिक संघटनांचे मान्यवर, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.






सदर प्रसंगी पूज्य भन्तेजींनी त्रिशरण, पंचशील दिल्यानंतर धम्मदेसना दिली त्यावेळी “कार्यसम्राट कालिदास कोळंबकर कोणत्याही पक्षात जावोत परंतु त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे त्या स्वकर्तुत्वावर ते निवडणूक येतात” असे प्रतिपादन केले व पुढील वाटचालीसाठी मंगलकामना दिल्या. तद्नंतर कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा याठिकाणी उभारण्यामागची कारणमीमांसा, इतिहास व कालानुरूप असलेली गरज यांची माहिती देत, सदर ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या सर्व शासकीय बाबींची पूर्तता करण्यात आली असून पुतळा पूर्ण बनून तयार आहे काही दिवसातच त्याचे लोकार्पण सर्वांच्या साक्षीने होणार आहे, आजवर आपण सदर विभागात दादर चैत्यभूमी ते दबक चाळ, विभागातील सर्व बुद्धविहारे येथे विविध उपक्रम राबवित आज भूमिपूजन झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आठ फुटी उंच चौथऱ्यावरील आठ फुटी उंच पुतळा आपण याठिकाणी बसवत आहोत कारण बाबासाहेबांच्या कार्याला दादर-नायगाव येथून सुरवात झाली आहे म्हणून त्यांच्या उपकारांची उतराई म्हणून आपल्याला जेवढी जेवढी शक्य होईल तेवढी तेवढी कामे मी करत आलोय आणि यापुढेही करत राहील, बाबासाहेबांच्या रक्ताचा नसलो तरी त्यांच्या विचारांचा मी वारसदार यानात्याने माझी जबाबदारी मी पार पाडेल” असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर सर्वांच्या व आकाशातून बरसणाऱ्या पावसाच्या साक्षीने कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेबांनी हातात कुदळ घेऊन पुतळ्याच्या निर्धारित जागेवर चर खणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भूमिपूजन झाले आहे असे त्यांनी घोषित केले.
सदर भूमिपूजन कार्यक्रमानंतर कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेबांनी पूज्य भन्ते संघास चिवर व धम्मदान देऊन त्यांना सन्मानित केले. तद्नंतर समता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप लहाशे आणि कुमार लिंगाडे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील तमाम बौद्ध उपासक, उपासिका, विविध संघटना त्यांचे कार्यकर्ते, महिला मंडळ व आयोजक संस्था त्यांचे कार्यकर्ते, सभासद यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.












