संस्थेची ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे म्हणजे त्या संस्थेचा आरसा होय: राजेश घाडगे

0
1

मुंबई दि. १९ (रामदास धो. गमरे) “बौद्धजन पंचायत समितीची स्थापना २५ मे १९४१ ला खार येथे एका परिषदेत लाटवणकर यांच्या घरासमोरील पटांगणात झाली परंतु त्याआधी सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संस्था निर्माण करून त्या यशस्वीपणे चालवल्या होत्या, जोपासल्या, त्या सर्व संघटना आज स्तुत्य उपक्रम राबवून अनेक कामे करीत आहेत ज्याचा समाजातील तळागाळातील लोकांना फायदा होत आहे, बौद्धजन पंचायत समिती त्यातील एक भाग असून सदर समितीला आज जवळपास ८२ वर्षांचा प्रदीर्घ कालखंड झालेला आहे आणि आजही ही संस्था आपल्या दीड हजार शाखांसह एकसंघ पध्दतीने कार्यरत आहे. या संस्थेच्या पंधराहून अधिक उपसमित्या असून सर्वच शाखा, उपसमित्या पारदर्शक पद्धतीने कारभार करीत आहेत, त्यातील बौद्धजन पंचायत समितीचे काळीज म्हणजे शिक्षण समिती, या समितीच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थ्यांना घडवतो, त्यांना शिक्षण घेण्यास मदत करतो त्याचप्रमाणे अर्थ समिती, न्यायदान समिती, विवाह समिती, संस्कार समिती अश्या अनेक समित्या, उपसमित्या आपण पंचायत समितीच्या माध्यमातून निर्माण करून माणसाला माणूस म्हणून घडवण्याचं, स्वतःच्या पायावर उभे राहण्याच उदात्त काम आपण करीत आहोत, बौद्धजन पंचायत समितीच्या एखाद्या शाखेचा कार्यकर्त्याला ही नगरसेवक पदाइतका सन्मान असतो, संस्थेचा कारभार शासकीय नियमानुसार काटेकोरपणे चालवला जात असून, संस्थेकडून सर्वच शासकीय नियमांचे पालन केले जाते, संस्थेचे अंदाजपत्रक शासकीय नियमानुसार काढले जाते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच भारतातील पहिलं स्मारक म्हणजे भैय्यासाहेब आंबेडकरांनी सन १९५८ साली उभारलेल बौद्धजन पंचायत समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह आज सदर सभागृहाचे बाबासाहेबांचे नातू व भैय्यासाहेबांचे सुपुत्र सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सात मजली इमारतीत रूपांतर केले आहे, ज्यात दोन एअरकंडिशन हॉल असून विद्यार्थी, महिलांच्या विकासाकरता अनेक उपक्रम प्रत्येक दालनात राबविण्यात येणार आहे. सदर संस्थेची ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे म्हणजेच आपल्या बौद्धजन पंचायत समितीचा आरसा होय, हाच आरसा डोळ्यासमोर ठेवूनच ही संस्था कार्यभार चालवत आहे” असे प्रतिपादन बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या सांगता समारंभ बोलत असता केले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिका संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार आणि चिटणीस मनोहर बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाते सदर प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी मनोहर बा. मोरे यांनी अत्यंत लाघवी शैलीत सूत्रसंचालन केले तर मंगेश पवार यांनी प्रास्ताविक सादर केले, धार्मिक विधी मंगेश पवार गुरुजी, मनोहर बा. मोरे गुरुजी व त्यांच्या उपासक, उपासिकांनी सुमधुर वाणीने पार पाडला तद्नंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, सदर प्रवचन मालिकेच्या निमित्ताने आयोजित श्रामणेर शिबिराकरता तसेच वर्षावास कार्यक्रमात ज्यांनी श्रमदान, भोजनदान, धम्मदान स्वरूपातील सेवा केली त्या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, चंद्रमणी तांबे, पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, चिटणीस विठ्ठलराव जाधव, श्रीधर साळवी, लवेश तांबे, यशवंत कदम, अरुण जाधव, रवींद्र शिंदे, महेंद्र पवार, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, सुरेश मंचेकर, गजानन तांबे, महिला मंडळाच्या सुशीलाताई जाधव, अंजलीताई मोहिते, महिला मंडळ, विश्वस्त मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात विनोद मोरे यांनी संस्कार समितीने बौद्धाचार्य, बौद्धाचार्यांना प्रथमच व्याख्याते म्हणून व्याख्यान देण्यास मंच उपलब्ध करून दिला, त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक चांगले वक्ते निर्माण होऊ शकतात त्याबद्दल त्यांचे कौतुक केले त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समितीच्या ज्या ज्या उपसमित्या सर्व नियमांचे पालन करीत उत्तम काम करत आहे त्यांचे कौतुक केले व ध्येयधोरणे व उद्दिष्टांना अनुसरून पुढील वाटचाल करावी आजवर आपण पारदर्शक पद्धतीने कारभार केला असेच पुढेही करत राहावे, समितीचे काम आजवर आपण इथवर आणले आहे ते पुढेही असेच सुरू ठेवावे असे सूचित करून सर्वांना मंगलकामना व सदिच्छा दिल्या, सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले