सिने गीतकार संगीतकार पार्श्वगायक विनोद धोत्रे यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्काराने सन्मानित

0

मुंबई दि. १६ (रामदास धो. गमरे) “कलावंत विचार मंच” व “कमल फिल्म प्रोडक्शन” यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच “कमल अमृततुल्य™” व “कमल उद्योग समूह™” यांच्या सौजन्याने भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामन दादा कर्डक, कवी वसंत बापट, कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या “राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार – २०२४” चा पुरस्कार सोहळा संस्थेचे अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पं. सा. सांस्कृतिक नाट्यगृह (जुने घेवदेव विभाग), शालिमार, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर पुरस्कार सोहळ्यात सम्यक कोकण संस्थेचे उपाध्यक्ष जेष्ठ सिने गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक विनोद धोत्रे यांना कलाक्षेत्रातील त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार – २०२४ देऊन त्यांना गौरविण्यात आले, सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सम्यक कोकण कला संस्था व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विनोद धोत्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने विनोद धोत्रे यांचे अभिनंदन करताना “विनोद धोत्रे हे कलावंतांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्यक कोकण कला संस्थेचे उपाध्यक्ष असून गेली बरीच वर्षे संस्थेशी निगडित आहे, संस्थेद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमात ते सहभागी होत असतात, त्यांचे कलाक्षेत्रावर असलेले नितांत व निस्सीम प्रेम आणि कलाक्षेत्रातील भरीव कामगिरी यामुळेच त्यांची राज्यस्तरीय कलावंत पुरस्कारासाठी निवड झाली आहे सम्यकचे सर्वच कलावंत हे नेहमीच कलाक्षेत्राच्या खुल्या आसमानात उंचच उंच झेप घेत स्वतः सोबत संस्थेचे नाव मोठं करतात, आज विनोद धोत्रे यांनी ही संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्याबद्दल त्यांचे मी सम्यक कोकण कला संस्था व महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीने अभिनंदन करतो” असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे यांनी काढले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार