कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा पुणे शहरातील महत्वपूर्ण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एक विधानसभा मतदारसंघ. कोथरूड विधानसभेत भलेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभव मिळाला तरी पुणे महापालिकेच्या माध्यमातून ‘कोथरूड’चा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी रचनात्मक कार्यातच अविरत कार्यमग्न काम करणारा आश्वासक चेहरा म्हणून कायमच स्वप्निल दुधाने यांचं नाव चर्चिले जाते! ....विचाराची पक्की बांधिलकी आणि पक्षादेश या दोन गोष्टींच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहोचवण्याची ‘तपपूर्ती’ची नाळेच्या जोरावरच पक्षनेतृत्वाने आदेशाने कोथरूड विधानसभा मतदारसंघाची महाविकास आघाडी तर्फे ‘जॉईंट किलर’ लढत विजयीच दृढनिश्चय करत या ‘शरदमित्रा’ने रणांगणात पाऊल टाकले आहे!






मुळात पुरोगामी विचारांचा पगडा असल्याने मतदारसंघात २००९पासून कोथरूड मतदारसंघात राष्ट्रवादीचा पुणे महापालिका निवडणुकांमध्ये वरचष्मा राहिला आहे. या मतदारसंघातील 3 क्षेत्रीय कार्यालयात कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. ज्या भागाचा पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी मध्ये समावेश करण्यात आला आहे तो भाग (बाणेर पाषाण बालेवाडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असून या भागाचा कायापालट करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोलाचे योगदान आहे. सतत नगरसेवक निवडून देत या भागातील पुरोगामी विचाराच्या नागरिकांनीही पक्षाला कायम साथ देण्याचे काम केले आहे. २००९ साली आघाडीतर्फे आणि सन २०१४ साली स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली असून सध्याच्या बदलल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता विद्यमान भाजपा आमदाराचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सक्षम पर्याय असून पक्षश्रेष्ठींकडे त्याची सुयोग्य आणि आकडेवारीसह माहिती जमा करून या ‘शरद मित्रा’ने यंदा या मतदारसंघात परिवर्तन करण्याचा संकल्प केला असून अन्य मिञपक्षाचे सहकार्य लाभल्यास यंदा ‘जॉईंट किलर’ लढतीत विजय शक्य असल्याची खात्रीही व्यक्त केली आहे. जनसेवेची संधी मिळाल्यानंतर फक्त आपल्या घरातील प्रगती आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये गुंतून न राहता घराघरांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या समस्या आणि अपेक्षित, शोषित लोकांच्या वेदना दूर करण्यापासून स्वप्नील दुधाणे यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यामुळेच केवळ दोन टर्ममध्येच साचेबंद विकासाचे धोरण आणि सर्वसामान्य लोकांचा विकास या जीवावरच या कर्वेनगरमध्ये धोरणात्मक विकासाचा चेहरा म्हणून एकमेव स्वप्निल दुधाने यांच्याकडे पाहिले जात असताना कोथरूड मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सन २००९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटेंना फक्तं ८००० मतांनी विजय मिळाला. २०१४च्या स्वतंत्र निवडणुकीत विद्यमान आमदार असतानाही चंद्रकांत मोकोटेंचा भाजपाच्या महिला उमेदवाराकडून मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात मनसेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला पण मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी सत्ताधारी महायुतीतील उमेदवाराच्या बाजूने असतानाही केवळ 25 हजाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारणं करावा लागला अशा वेळी प्रचारास मिळालेला कमी वेळ आणि नियोजनाचा अभाव यामुळे किशोर शिंदे यांचा निसटता पराभव झाला. कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा सुशिक्षित, मध्यमवर्गीय, नोकरदार वर्ग, झोपडपट्टीधारक नागरिक अश्या समिश्र वर्गांची लोकवस्ती असलेला आहे. योग्य प्रचार यंत्रणा, मजबूत संघटन बांधणी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपल्या विचारांना मानणाऱ्या वर्गाशी संवाद आणि सूक्ष्म बूथ मॅनेजमेंटच्या भरोश्यावर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार मताधिक्य मिळू शकेल असा विश्वासही या शरदमिञ स्वप्नील दुधाने यांनी व्यक्त केला आहे.
नुकतेच पार पडलेल्या पुणे लोकसभेच्या मतदानात कोथरुड विधानसभेत झालेल्या मतदानात स्थानिक उमेदवार असतानाही केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांना १,४१,७२८ मते मिळाली असुन पुरोगामी विचारधारेच्या मा. रविंद्र धंगेकर यांना ६७,६७१ मते मिळाली असून मागील लोकसभा निवडणुकीतील कोथरूडचे मताधिक्य स्व. गिरीश बापट यांच्या मताधिक्यापेक्षा कमी (७४,२५७) आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघाची सन २०१९ मधील विधानसभेची मतदान आकडेवारीनुसार मा. चंद्रकांत पाटील (भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार) यांना १,०५,२४६ मते मिळाली होती. मा. किशोर शिंदे (मनसे) यांना पुरोगामी विचारधारेच्या काँग्रेस-राष्ट्रवादी मतांमुळे ७९,७५१ चा टप्पा गाठणे शक्य झाले. त्यावेळी विद्यमान आमदार मा. चंद्रकांत पाटील यांचे मताधिक्य केवळ २५,४९५ होते. 2024मध्ये कोथरुड विधानसभेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा फक्त एकच नगरसेवक असला तरी या पक्षाची मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली मदत होईल असा आशावादही कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांना वाटत आहे.










