विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याचा काही तास उरलेले असताना कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला लक्ष करत या मतदारसंघांमध्ये फलकबाजी करत एक मोठा एक प्रश्न निर्माण केला आहे की, या महाराष्ट्रात नक्की कोण सुरक्षित आहे?. अशी थेट फलकातूनच विचारणा करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने चला संकल्प करूया….महाराष्ट्रात परिवर्तन घडवूया. असे आवाहन करत सर्वसामान्य मतदारांना भारतीय जनता पक्ष सध्याच्या परिस्थितीला कसा कारणीभूत आहे याची जाणीव या फलकातून करणार करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात नक्की कोण सुरक्षित आहे?.
महाराष्ट्रात मंत्री सुरक्षित नाही, आमदारही नाही, नगरसेवक नाही, महिलाही नाही एवढेच काय तर चिमुकल्या शालेय विद्यार्थिनी नाही. असे भावनिक मुद्दे घेऊन भारतीय जनता पक्षाला लक्ष करण्यात आले आहे. मग सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी बघायचं तरी कोणाकडे? असा मतदारांना आवाहनात्मक प्रश्न विचारून चला संकल्प करूयाही परिस्थिती बदलण्याचा महाराष्ट्रात परिवर्तन घडवूया मोठी साद ही घालण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभेच्या वतीने अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने ठिकठिकाणी असे फलक लावण्यात आल्यामुळे कोथरूड मध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.