हमाम मे सब नंगे है, उगाच बडबड करू नका” ; नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

0

“काल कंगना रनौत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं. त्या निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत. तुमच्या सारख्या बँकडोअरने आलेल्या नाहीत” अशी टीका नितेश राणे संजय राऊत यांच्यावर केली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर तिकडे किती दिवस राहायचा? त्याच उत्तर कधी देणार” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “संजय राऊत हे महाशय ज्या निवासस्थानी राहतात, तिथे बॉलीवूडची कलाकार किती दिवस राहिली याची माहिती द्यायची का?. हमाम मे सब नंगे है, उगाच बडबड करू नका” असं नितेश राणे म्हणाले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

“ड्रग्ज प्रकरणावरुन नितेश राणे यांनी संजय राऊतवर जोरदार हल्लाबोल केला. “गजनी झालेल्या राऊतला माहित नाही, अडीच वर्ष मविआची सत्ता होती. तुमचे मालक मुख्यमंत्री होते, तेव्हा ड्रग्स का थांबले नाहीत?. तुम्ही काय प्रयत्न केले? तुमचे गृहमंत्री जेलमध्ये होते” असं नितेश राणे म्हणाले. “उडता मातोश्री बाबत चिंता करा. तुझ्या मालकाचा मुलगा ड्रग्सवाल्या लोकांसोबत का असतो? रिझवी कॉलेजच्या मागे कोण भेटायचं? अमली पदार्थाचे धागेदोरे मातोश्री वरून मिळतील. कुंपण शेत खात आहे” असा आरोप नितेश राणे यांनी केला.

‘उडता पंजाब नंतर उडता मातोश्री चित्रपट काढायचा का?’

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

“तुमच्या सारखी सवय दुसऱ्यांना नाही. तुमच्या दिल्लीच्या बंगल्यावर कोण अभिनेत्री येते याची माहिती जनतेला मिळावी” असा आरोप नितेश राणे यांनी केला. “उज्वल निकम यांनी कसाबला फाशी देण्यास मदत केली. मात्र असंख्य गुन्हेगारांची बाजू घेणारे मेंनन वकील तुमच्या शरद पवारांच्या बाजूला बसतात. गुजरात मोठं केंद्र आहे की, मातोश्री तिसरा मजला केंद्र आहे, याची चौकशी केली पाहिजे. उडता पंजाब नंतर उडता मातोश्री चित्रपट काढायचा का?” अशा शब्दात नितेश राणे यांनी हल्लाबोल केला. “संजय राऊतने ड्रग्स या विषयावर बोलून, मालकाच्या मुलाला अडचणीत आणू नये मैत्रीचा सल्ला” असं नितेश राणे म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार