पुणे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये स्थापनेपासून ‘तपपूर्ती’पर्यंत गणेश नगर एरंडवणा या प्रभाग 13 मध्ये सक्रिय असलेले मंदार बलकवडे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आणि या नवशिलेदाराने या प्रभागात प्रवेशापासून पक्षकार्यासाठी अर्पित आयुष्य देण्यास सुरुवात केली. पुणे महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका त्यामुळे स्थानिक नागरिकांची होणारे अडचण दूर करण्यासाठी नित्य या नागरिकांच्या संपर्कात राहत या प्रभागांमध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मधील भक्कम दुवा होऊन या प्रभागातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम करत आहे.
पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोथरूडची ओळख शहरभर असली तरी कोथरूड च्या नवसह्याद्री एरंडवणे कर्वेनगर अशा नदीपात्रालगतच्या भागातील लोकांना आपली सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी कोथरूड गावठाणासह अन्यत्र जावं लागत होतं. हीच गरज ओळखून या नवशिलेदाराने कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दि.१६ ॲाक्टोबर रोजी राहुल देशपांडे live in concert चे आयोजन मंदार बलकवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास ना.चंद्रकांत दादा पाटील, ना. मुरलीधर आण्णा मोहोळ उपस्थित राहणार आहेत. राहुल देशपांडे यांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी वरील क्रमांकावरती मोफत प्रवेशिका देण्यात आल्या असून प्रभागातील सर्व नागरिकांनी या अनोख्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंदार चंद्रशेखर बलकवडे यांनी केले असून काही अडचण असल्यास व्यक्तिगत या 9730949494 क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.