खडकवासल्यात लाडक्या बहिणींचा उत्साही सन्मान सोहळा! धो-धो पावसातही 15,000 महिलांचा साडी भेट देऊन सन्मान

0
21

खडकवासला विधानसभा मतदारसंघात नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेअंतर्गत 15,000 महिलांना साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महिलांच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी करण्यात आले होते. योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्यासह त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, यावेळी झालेल्या मुसळधार पावसातही महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, जे त्यांच्या सहभाग आणि या योजनेविषयीच्या उत्साहाचे प्रतीक होते. साडीभेट देण्याच्या या कार्यक्रमातून महिलांप्रती आदरभाव आणि त्यांचे समाजातील महत्त्व अधोरेखित करण्याचा उद्देश साध्य झाला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, आणि महिलांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

दिलीप वेडेपाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा यावेळी विशेष आकर्षण ठरली. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक सौ. मंजिरी दत्तात्रय मारणे, द्वितीय क्रमांक सौ. सुवर्णा किरण मते, तृतीय क्रमांक सौ. रेखा रमेश गोपाळघरे, चतुर्थ क्रमांक सौ. आरती निलेश इंगवले आणि पाचवा क्रमांक सौ. पल्लवी वीरकर यांनी मिळवला. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांच्या कलात्मकतेचे कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या अद्वितीय सजावटीमुळे या स्पर्धेला विशेष यश लाभले.

यावेळी ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी महिलांना उद्देशून म्हटले की, “शक्ती कितीही मोठी असली तरी तिचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असते. याच इच्छाशक्तीच्या बळावर नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची खडकवासला विधानसभेत विक्रमी नोंदणी केली आणि हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.” त्यांनी दिलीप अण्णांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांच्या कार्यामुळे महिलांचे सशक्तीकरण झाले असल्याचे अधोरेखित केले.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

कार्यक्रमात माजी नगरसेविका सौ.मोनिकाताई मोहोळ यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सांगितले की, “खडकवासला मतदारसंघातील महिला भगिनी दिलीप अण्णा वेडेपाटील यांच्या कार्याला संपूर्णपणे पाठींबा देत आहेत, हे एवढा मुसळधार पाऊस असूनही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवते. महिलांचा हा उत्साह आणि पाठिंबा दिलीप अण्णांच्या कार्यावरील विश्वास आणि निष्ठेचे प्रतीक आहे.” त्यांच्या या विधानातून महिलांमधील एकोपा आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी दिलीप अण्णा वेडेपाटील यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली.

 सदर कार्यक्रमास माजी नगरसेविका मोनिकाताई मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, संदीप महाराज गोगावले,प्रसन्न जगताप, दिलीप बराटे, वृषाली चौधरी, राणिताई भोसले, सचिन दांगट, बाबा धुमाळ, मनिषाताई मोरे, शैलेश वेडेपाटील, संजय लोणकर, मनीष देव, दुष्यांत भाटिया यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांप्रती आदरभाव आणि त्यांच्या समाजातील महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्याचा उद्देश साध्य झाला असल्याचे दिलीप वेडेपाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे