बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. संस्थेची कार्यकारिणी जाहीर

0

गुहागर दि. २४ (रामदास धो. गमरे) वस्तू आणि सेवा ह्यांच्या देवघेवीत वस्तूची व सेवेची किंमत काही काळानंतर चुकती करण्याची ऋणकोला धनकोकडून मिळणारी कर्जाऊ रक्कमेची सवलत म्हणजेच “पत (क्रेडिट – Credit)” व अशी पत देणारी स्थानिक लोकांद्वारे स्थानिक लोकांसाठी चालविण्यात येणारी संस्था म्हणजेच पतसंस्था (क्रेडीट सोसायटी – Credit Society) अश्या प्रकारची पतसंस्था आपल्या गुहागर तालुक्यामध्ये असावी या उद्देशाने अथक परिश्रम घेऊन प्रवर्तक काशिनाथ चांगु जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रथमच बौद्धांसाठी बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेची स्थापना केली असून या पतसंस्थेची संचालक मंडळाची सभा नुकतीच मु. पो. जानवळे, ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे संपन्न झाली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सदर प्रसंगी महेंद्र मोहिते यांनी लाघवी भाषेत व प्रभावी शैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितीतांची मने जिंकून घेतली, तर प्रवर्तक दीपक मोहिते यांनी प्रस्ताविक सादर करताना पतसंस्थेच्या ध्येय आणि धोरणे यांची माहिती दिली, तद्नंतर सर्वांच्या संमतीने खालीलप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, लेखा परीक्षण समिती, कर्ज वसुली समिती, व्यवस्थापन समिती यांची स्थापना करण्यात आली त्यात संचालक मंडळात अध्यक्षपदी काशिराम चांगु जाधव, उपाध्यक्षपदी सुनिल सखाराम जाधव, सचिवपदी महेंद्र महादेव मोहिते, सहकार तज्ञ संचालक पदी संजय रामचंद्र पवार व शांतिदुत शिवराम जाधव तसेच संचालकपदी रामदास धो. गमरे, शैलेंद्र शांताराम पवार, दीपक महादेव मोहिते, विश्वनाथ बाबू कदम, संजय भिकाजी जाधव, विश्वास विजय मोहिते, रुपेश सुरेश सावंत, मनीषा महेंद्र जाधव, साक्षी मनोज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तसेच लेखा परीक्षण समितीमध्ये अध्यक्षपदी काशीराम चांगु जाधव, उपाध्यक्षपदी सुनिल सखाराम जाधव, सचिवपदी महेंद्र महादेव मोहिते, सदस्यपदी शैलेंद्र शांताराम पवार, संजय भिकाजी तांबे व शांतीदूत शिवराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली, कर्ज वसुली समितीमध्ये कर्ज वसुली समिती अध्यक्षपदी काशीराम चांगु जाधव, उपाध्यक्षपदी सुनिल सखाराम जाधव, सचिवपदी महेंद्र महादेव मोहिते, सदस्यपदी रामदास धोंडू गमरे, रूपेश सुरेश सावंत, विश्वास विजय मोहिते, सौ. मनीषा महेंद्र जाधव व सौ. साक्षी मनोज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तसेच व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्षपदी काशीराम चांगु जाधव, उपाध्यक्षपदी सुनिल सखाराम जाधव, सचिवपदी महेंद्र महादेव मोहिते, सदस्यपदी विश्वनाथ बाबू कदम, दिपक महादेव मोहिते व संजय रामचंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सरतेशेवटी बौद्धजन सहकारी संघाचे चेअरमन व पतसंस्थेचे प्रवर्तक विश्वनाथ कदम यांनी सभेचा आढावा घेऊन उपस्थित सर्वांचे आभार मानून मिटिंगची सांगता केली.