विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेसाठी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पुरंदर, मावळ, मुळशी तालुक्यांतही गर्दीचे ‘टार्गेट’

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 26) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्यासाठी भाजप नेते जोरदार कामाला लागले आहे.नुकतेच या दौऱ्याच्या निमित्ताने नियोजनासाठी बैठक झाली. बैठकीत गर्दी जमविण्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याची माहिती आहे.

नुकतीच कर्वेनगर येथे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालखी मार्ग आणि इतर विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. हा कार्यक्रम भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कर्वेनगर परिसरामध्ये आयोजित केला होता.महायुतीच्या दिग्गजांची फळी व्यासपीठावर होती. कोथरूड आणि परिसरात कार्यक्रमाची मोठी ‘फ्लेक्स’बाजी करण्यात आली होती. असे असतानाही कार्यक्रमाला अपेक्षित अशी गर्दी जमवण्यात अपयश आल्याच्या चर्चा सुरू आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

या कार्यक्रमांमध्ये जगन्नाथ महाराज पाटील यांच्या कीर्तनसेवेमुळे वारकरी संप्रदायाने थोडी फार गर्दी केल्यामुळे भाजपासाठी काहीशी दिलासा देणारी बाब होती. तरी देखील या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच काँग्रेस कार्यकत्यांनीदेखील सोशल मीडियावर व्हायरल केले.

ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे खडबडून जागे होत भाजपने शहर व ग्रामीण भागांतील पदाधिकायांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले असल्याचे सांगितले जात आहे. कर्वेनगर येथील कार्यक्रमांमध्ये खुर्च्यां रिकाम्या राहिल्या. त्यात भाजप कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे भाषणाला उभे राहतात घोषणाबाजी केली या घोषणांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी उत्तर देखील दिले. सगळ्या गोष्टींचा चिंतन नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाळण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडे नियोजन करण्यात आलं आहे. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी ‘टार्गेट’ देण्यात आले. त्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील भाजपचे दोन हजार पदाधिकारी कामाला लागले आहेत. मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करून तेथून नियोजनाचे काम सुरू आहे.

केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्येच नव्हे, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पुरंदर, मावळ, मुळशी या तालुक्यांतून मोदी यांचा मुख्य कार्यक्रम होणाऱ्या एसपी कॉलेज मैदानावर गर्दी जमविण्याचे ‘टार्गेट’ पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

सध्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांवर अनेक ठिकाणी प्रशासक असल्यामुळे गर्दीसाठी माजी नगरसेवक, सदस्यांकडून देखील फारसा प्रतिसाद मिळत नाही; परंतु तरीदेखील गाड्यांची व्यवस्था आणि खर्चाची तजवीज करण्यात आली आहे.