भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी गडकरींची विकासाची चतुःसूत्री; तंत्रज्ञानातून भविष्य घडविण्याचा निर्धार

0
1

पुणे : “वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. यामुळे कृषीसह उद्योग क्षेत्राची भरभराट होईल. यातून अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि विकासदर वाढेल. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन गरिबी कमी होण्यास मदत होईल. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन वर्तमान काळात अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्याची आवश्यकता आहे. या जोरावर भारत विश्वगुरू होईल,” असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नानासाहेब परुळेकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील भारताचे भविष्य’ या विषयावर गडकरी यांनी विचार मांडले.

गडकरी म्हणाले, “देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचा १४, उत्पादन क्षेत्राचा २२ ते २४, तर सेवा क्षेत्राचा वाटा ५२ ते ५४ टक्के आहे. महात्मा गांधी यांनी १९४७ मध्ये ग्रामीण भाग केंद्रस्थानी ठेऊन विकासाची संकल्पना मांडली होती, मात्र गेल्या ७५ वर्षांत शहराकडे स्थलांतर वाढले. दुर्दैवाने समाजात शेतकऱ्यांना दुय्यम दर्जा मिळाला. तंत्रज्ञानाचा वापर करून शेत पिकाच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधनाची निर्मिती केली तर आयात कमी होईल. त्यातून वाचलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत गेला तर त्यांचे जीवन सुखीसमृद्ध होईल. शेतकरी काडीकचरा जाळून टाकत होते, पण त्यापासून इथेनॉलनिर्मिती शक्य आहे.

मका, बांबूच्या वापरातून इथेनॉलनिर्मिती केली जाते. गेल्या वर्षी मक्याचा भाव १२०० रुपये प्रति क्विंटल होता. इथेनॉलमुळे यंदा मक्याला २८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बिहारमध्ये मक्यापासून इथेनॉलनिर्मितीचे १५ कारखाने सुरू झाले आहेत.शेतीतील भात, गहू या पिकांपेक्षा ऊर्जा आणि इंधनाचा विचार करून पीक पद्धतीमध्ये बदल झाल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती क्षेत्राचा विकासदर १४ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो आणि प्रदूषणही रोखता येईल.”

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

वाहन उद्योगात १० वर्षांत पहिल्या नंबरवर

तीन महिन्यांपूर्वी वाहन उद्योग क्षेत्रात भारताने जपानला मागे टाकले आहे. अमेरिका पहिल्या, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर असून, भारताचा तिसरा क्रमांक आहे. येणाऱ्या काळात वाहन उद्योगात भारताचे भविष्य उज्ज्वल असून, पुढील १० वर्षात पहिल्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही. त्या वेळी १० कोटी रोजगार निर्माण होतील. हा उद्योग केंद्र व राज्य सरकारला सर्वाधिक जीएसटी देत आहे, निर्यातीत अग्रेसर आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

अर्ध्या मिनिटात बस चार्ज

नागपूरमध्ये नवीन प्रकल्प आणला आहे. तो पुण्यालाही मिळेल. बस चार्जिंग करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आले आहे. बस थांब्यावर थांबल्यानंतर चार्जर खाली येईल आणि अर्ध्या मिनिटात बस चार्ज होऊन ती पुन्हा ४० किलोमीटरपर्यंत धावू शकेल. हे तंत्रज्ञान पुण्यात आल्यानंतर पीएमपीचे तिकीटदर ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील. या तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू केली जाणार आहे. ही सेवा पुण्यातही येऊ शकते, असे गडकर म्हणाले.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

पदवी-यशाचा संबंध नाही

१९७५ च्या आणीबाणीच्या काळात मी बारावीत होतो. जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मी त्या वेळी आंदोलनात उतरलो. त्यामुळे बारावीला केवळ ५२ टक्के गुण मिळाले. मला अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला नाही. पण मला नऊ वेळा डि.लीट प्रदान करून गौरविण्यात आले असून, त्यातील सहा डि.लीट कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. पदवी आणि यशाचा काही संबंध नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज यांनी कोणत्याही विद्यापीठात जाऊन पदवी घेतलेली नव्हती.
तरीही त्यांनी समाजाला दिशा दिली. ज्यांना आपण दुरून मोठे समजतो, ते जवळ आले की त्यांचे अज्ञान कळते. चांगुलपणाचा संबंध जात, पंथ, धर्म, गुणवत्ता यावरून कळत नाही, तर तो चाल, चलन, चारित्र्यावरून कळतो, असेही गडकरी यांनी सांगितले.

हायड्रोजन हेच भविष्य

• दिल्लीत कचऱ्याचे डोंगर आहेत. रस्तेनिर्मितीसाठी सात लाख टन कचरा वापरला जातो.

कचऱ्यातून हायड्रोजन तयार होऊ शकते. हायड्रोजनच्या निर्मितीचा एक किलोचा दर एक डॉलरचा झाला, तर भारत ऊर्जेचा निर्यातदार देश बनू शकतो.

• आपल्याकडील कचऱ्यातील मिथेन काढून त्यातून हायड्रोजन तयार करता येऊ शकते.

पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन निर्माण झाल्यास पैशांची मोठी बचत होईल. प्रदूषणात घट होईल.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

• पाच वर्षांत पुण्यात एकही बस डिझेलवरची दिसणार नाही.

• पुण्यात प्रचंड प्रदूषण झाले आहे. लोकसंख्या बेसुमार वाढत आहे. वायू प्रदूषण, जल प्रदूषण कमी करणे गरजेचे.

• इंधन आयात करण्यासाठी आपण २२ लाख कोटी रुपये खर्च करतो, पण इथेनॉल, सीएजी, बायोडिझेल यातून आपण बचत करू शकू, असे गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले…

• तंत्रज्ञान बदलले की देशाचे भविष्य बदलते

• यापूर्वीच्या सरकारकडून पाणी, ऊर्जा, शाळा, चिंतन यांना प्राधान्य मिळाले नाही

• पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग

वाढल्याने दळणवळणाचे प्रकल्प मार्गी लागले

जल वाहतूक, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक आणि त्यानंतर हवाई वाहतुकीला प्राधान्य

नागपूरमध्ये मैलापाणी शुद्ध करून ३०० कोटी रुपये महापालिकेला मिळतात

संपूर्ण भारत जोडणार

• औद्योगिक, कृषी प्रगतीसाठी महामार्गाची बांधणी आवश्यक

• २०२४ पर्यंत अमेरिकेपेक्षा महामार्गाची लांबी जास्त व्हावी म्हणून प्रयत्नशील

• आम्ही हिमालयात बोगदे बांधले, मनाली, लेह, लडाख,

काश्मीरचा भाग जोडल्यानंतर तेथे पर्यटनही वाढले.

• ईशान्य भारतात रस्त्यांची तीन लाख कोटींची कामे केली.

• उत्तरेतील वाहतूक मुंबई, पुण्यात न येता सुरतवरून

दक्षिणेत जाण्यासाठी महामार्ग बांधणार

• मुंबईतील अटल सेतू ते पुण्यातील रिंगरोड आणि पुढे बंगळूरला जोडणारा महामार्ग केला जाणार