मुंबईतील धारावीत तणाव निर्माण झाला आहे. धारावीत असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला आहे. हा अनधिकृत भाग तोडण्यास विरोध दर्शवत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे धारावीत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. संतप्त नागरिकांनी मुंबई मनपाच्या वाहनांची तोडफोड केली आहे. वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या आहेत. तणावाची परिस्थिती पाहून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले होते. दरम्यान, लोकांच्या विरोधामुळे मनपाच्या पथकाने तुर्त कारवाई थांबवली आहे.






पोलिसांकडून चर्चा, तणाव निवळण्यासाठी प्रयत्न
धारावीत संतप्त जमावाकडून गोंधळ सुरु आहे. एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक शनिवारी सकाळी धारावीत गेले होते. मनपाचे पथक जाताच एका समुदायाने हा अनिधिकृत भाग तोडण्यास विरोध केला. त्या समुदायाचे शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पोलिसांकडून या समुदायाशी बोलणी सुरु केली आहे. बीएमसीच्या कारवाईला विरोध करत आहे.
रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला
लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. त्यांची समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस लोकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वर्षांपासून या धार्मिक स्थळावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. परंतु हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास विरोध केला जात आहे.











