अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण करीता मनोज जरांगे व सहकारी ता.26 जानेवारी पासून उपोषण करत आहे या ठिकाणी जरांगे यांचे सातवे उपोषण चालू आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनातले काय आहे आरक्षण देणार किंवा नाही हे समाजाला कळाले पाहिजे त्यांची या बाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे असे मनोज जरांगे यांनी सोमवार ता. 27 रोजी माध्यमांशी बोलताना सांगीतले.






अंतरवाली सराटीत मनोज जरांगे व शंभर ते दिडशे सहकारी ता.26 पासून उपोषण करत आहे यांचा सोमवार ता. 27 रोजी तिसरा दिवस आहे या ठिकाणी उपोषण कर्त यांची तब्येत खालावत चालली आहे जरांगे हे आपल्या उपोषणावर ठाम आहे.
या ठिकाणी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सांगितले की, सरकारणे संपर्क करण्याची गरज नाही आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे कळाले पाहिजे , मुख्यमंत्री फडणवीस हे आरक्षण देणार आहेत का नाही हे आम्हाला कळणे गरजेचे आहे त्यांची काय भूमिका आहे स्पष्ट करावी , मस्साजोग चे धनंजय देशमुख, वैभवी देशमुख या दुःखात आहे त्यांनी उपोषणात सहभागी होण्याची गरज नाही या ठिकाणी जे उपोषणाला बसले आहे त्यांचे शरीर खराब होईल त्यांनी सुध्दा उपोषण मागे घ्यावे मी उपोषण करण्यास ठाम आहे आम्ही खुनशी नाही, दहशतवादी नाही, आम्ही कुणाचा तिरस्कार करत नाही येथे देशातील लोक भेटण्यासाठी येतात आम्ही कोणाला नाही म्हणत नाही असे मनोज जरांगे यांनी मंत्री पंकाजा मुडे यांचे नाव न घेता सांगीतले.
प्रजासत्ताक दिन निमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी जरांगे यांची भेट घेण्याबाबत जालना येथे सांगीतले होते यावर जरांगे यांनी आमची कोणाला ना नाही असे सांगितले. आरक्षण प्रश्न सुटावा हा आमचा उद्देश आहे अशोक चव्हाण, मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करावी किंवा कोणी दुसऱ्याने करावी आमची हरकत नाही मात्र आरक्षण मिळावे हि अपेक्षा आहे या ठिकाणी आरक्षण देण हि मुख्यमंत्री फडणवीस यांची जबाबदारी आहे लोकांची तब्येत खालावत चालली आहे या कडे फडणवीस यांनी लक्ष दिले पाहिजे बीड मधील घटने बाबत गुंडगिरी संपावयाची का वाढवयाची याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावा अंतरवाली सराटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून कोणतेही शिष्टमंडळ पाठवले नाही असे जरांगे यांनी सांगितले.











