मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार; मंत्री शंभूराज देसाईंचीही मध्यस्थी कामी

0
1

आमरण उपोषणामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे समर्थक आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी उपचार घेण्याची विनंती केली होती. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार घेतले.

आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची केली विनंती केली होती. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. मध्यरात्री पावणेदोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. यावेळी मध्यरात्री मनोज जरांगे समर्थक आंदोलकांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला. या आग्रहानंतर त्यांनी उपचार घेण्यास होकार दिल्याने त्यांच्यावर आता उपचार करण्यात आलेत.