कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय संत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त स्वच्छता प्रचार फेरी व जनजागृती!

0

“स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२६” तसेच “पुणे स्वच्छता पूर्व स्पर्धा” अन्वये “संत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंती” निमित्त प्रभाग क्रमांक ३१, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभाग, कमिन्स इंडिया लि.,सेवा सहयोग फाउंडेशन, जनवाणी व स्वच्छ सहकारी संस्था, सरस्वती विद्यामंदिर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता स्वच्छता प्रचार फेरी व जनजागृती मोहीम राबवण्यात आली. तसेच संत गाडगे महाराज यांनी संसाराचा त्याग करून खेडोपाडी जाऊन स्वतः हातात खराटा घेऊन संपूर्ण गावाचा परिसर स्वच्छ करून तेथील नागरिकांना कीर्तनाच्या माध्यमातून स्वतःची व आपल्या परिसराच्या स्वच्छते विषयी जनजागृती करत असत. या त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार सातत्याने चालू राहावा म्हणून पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आपले पुणे शहर व उपनगर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच स्वच्छतेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन आपले पुणे शहर व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच स्वच्छता ही जनतेची चळवळ व्हावी म्हणून जनजागृती प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

सदर कार्यक्रम प्रसंगी लोकप्रतिनिधीच्या हस्ते संत गाडगेबाबा व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने १८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सन्माननीय नगरसेवकांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम सरस्वती प्रशालेच्या पटांगणामध्ये घेण्यात आला. महानगरपालिकेच्या व सेवा सहयोग फाउंडेशन च्या वतीने प्रमुख उपस्थित असलेल्या मान्यवर लोकप्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला. गाडगे बाबांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक पृथ्वीराज दादा सुतार, वासंती जाधव, दिनेश माथवड,ज्योत्स्ना कुलकर्णी नवनाथ जाधव, जगन्नाथ कुलकर्णी, महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयी विशेष मार्गदर्शन केले. स्वच्छता विषयी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक कैलास सरतापे व प्रास्ताविक मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी केले.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

सदर प्रचार फेरीमध्ये सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक किरण कोल्हे, कैलास सरतापे,१८० विद्यार्थी, शिक्षक, पालक,आरोग्य निरीक्षक किरण जाधव, दत्तात्रय दळवी, राजेश आहेर, मोकादम वैजीनाथ गायकवाड,आण्णा ढावरे, कमिन्सचे संपत खैरे, सेवा सहयोगचे युवराज चाबुकस्वार, मंदार जाधव, हेंमत भराडे, स्वच्छ सहकारी संस्थेच्या संध्या ढमाले, शिवाजी सकट, तसेच भागातील नागरिक जनसेवक बाळू दांडेकर, सुभाष निंबाळकर, अजय चोरी व इतर नागरिक प्रचार फेरी मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या प्रचार फेरीमध्ये “संत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा महामंत्राचा जयघोष करत तसेच त्यांचा दशसूत्री संदेश भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र,गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत,बेघरांना आसरा,अंध पंगु रोगी यांना औषधोपचार,बेकार ना रोजगार,पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, दुःखी व निराशाना हिम्मत, गोरगरिबांना शिक्षण तसेच ओला सुका कचरा वेगळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आपले आरोग्य धोक्यात आणू नका, नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका, जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आणू नका, सार्वजनिक रस्त्यावर व रिकाम्या जागेवर कचरा टाकू नका, प्लास्टिकचा वापर टाळा कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, विधी सिगारेट ओढू नका आपले आरोग्य धोक्यात आणू नका, गोवा गुटखा खाऊन सार्वजनिक रस्त्यावर थुंकू नका, स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी व्हा” असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

अधिक वाचा  राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदल येथे ‘अवकाळी’ची शक्यता; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आसुसलेल्या आशा पालवल्या