पूजा खेडकर यांच्याविरोधात आता मागासवर्ग आयोग ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

0
1

आयएएस अधिकारी पूज खेडकर यांच्या अडचणी वाढतच जात आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर यूपीएससीने खेडकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवली आहे, असा दावा केला जात आहे. यामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर करणे या आरोपांचा समावेश आहे. याच आरोपानंतर आता केंद्रीय मागासवर्ग आयोगही पूजा खडेकर प्रकरणात लक्ष घालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे.

मागासवर्ग आयोग नेमकं काय करणार आहे?

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार आहे. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का? हे आयोगामार्फत तपासले जाणार आहे. आपल्या या तपासात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर यांच्या जात प्रमाणपत्राचीही वैधता तपासणार आहे. तशी माहिती आयोगातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

मागासवर्ग आयोग देशभरात मोहीम चालवणार

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पूजा खेडकर यांच्यासंबंधी काही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीनंतर मागासवर्ग आयोगाने DoPT म्हणजेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे विचारणा केली आहे. मागासवर्ग आयोग लवकरच एक मोहीम चालू करणार आहे. यामध्ये पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आलेल्या तक्रारींची आयोग दाखल घेणार आहे.

पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तुमचे केडर रद्द का करू नये, अशी विचारणा यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याकडे केली आहे. तसेच यूपीएससीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पुण्याच्या गुन्हे शाखेनेही पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

मनोरमा खेडकर यांची कार जप्त

दरम्यान, पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकवताना मनोरमा खेडकर यांनी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.