पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने मागितली भारतीय चाहत्यांची माफी, नेमकं काय आहे प्रकरण ?

0

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान जितका त्या देशात प्रसिद्ध तितकेच भारतातही त्याला पसंत केले जाते. त्याचे असंख्य भारतीय चाहते आहेत. फवाद खानचे अनेक चित्रपट आणि सीरियल्सही भारतात खूप पाहिल्या जातात. असे अनेक लोक आहेत, ज्यांनी फवादचं काम वारंवार बघितलंय. पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये नावाजलेला आणि अव्वल अभिनेत्यांपैकी असलेल्या फवाद खानने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. खूबसुरत, ऐ दिल है मुश्किल, कपूर अँड सन्स यांसारख्या अनेक चित्रपटात फवादने त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. मात्र पाकिस्तानी कलाकांराना भारता काम करू देण्याबद्दल अनेकांनी निषेध व्यक्त केल्यावर हे प्रकरण बरंच तापलं आणि त्यानंतर फवाद हिंदी चित्रपटांत दिसला नाही.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

का मागितली माफी ?

पण आता अनेक वर्षांनी फवाद खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने आपल्या भारतीय चाहत्यांची माफी मागितली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, फवादने त्याच्या चाहत्यांची माफी मागितली. ‘ज्या चाहत्यांनी माझी वाट पाहिली त्यांचा मी आभारी आहे. पण त्यांना इतका वेळ वाट पहायला लावल्याबद्दल मी माफी मागतो. पण ते माझ्या हातात नव्हते.’ असे फवादने म्हटले. ‘ प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते यावर माझा विश्वास आहे’, असेही फवादने सांगितले.

हमसफर आणि जिंदगी गुलजार है , या फवादच्या मालिका खूप लोकप्रिय आहेत. भारतातील लोकांनाही त्या मालिका खूप आवडतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या अभिनय कारकिर्दीला नुकतीच सुरुवात झाली असली तरी भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे या स्टार्सवर बंदी घालण्यात आली होती.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भारतातील बंदीनंतरही फवाद खान पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम करत होता. अभिनयाच्या जगात तो सतत सक्रिय असतो. काही रिपोर्ट्सनुसार, सुमारे 8 वर्षांनंतर फवाद खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा पुढचा प्रोजेक्ट अभिनेत्री वाणी कपूरसोबत असणार आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकल्पाशी संबंधित माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.