पुणे महानगरपालिकेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी हवाई उड्डाण मंत्री श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थिती मध्ये पुणे मनपा आयुक्त व सर्व अधिकारी यांच्या समवेत विविध नागरी समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या व मागण्या पुणे मनपा आयुक्तांसमोर नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी मांडल्या.






पुणे शहराचे पश्चिम द्वार म्हणून कोथरूड वारजे या भागाला पाहिले जाते परंतु पुणे महापालिकेच्या प्रशासकीय दिरंगाईचा या भागाला आहे. चांदणी चौक विकसित झाल्यानंतर या भागातील समस्या संपतील अशी स्थानिक नागरिकांच्या अशा होती परंतु पुणे महानगरपालिकेच्या दप्तरदिरंगाई मुळे या भागातील लोकांना होणाऱ्या दिरंगाई पासून दिलासा मिळाला नाही. पुणे शहराच्या पश्चिम विभागात असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रवेश करताना असलेली सर्वच्यासर्व प्रवेशद्वारे चांदणी चौक, आंबेडकर चौक, नवले ब्रिज, राजारामपुल या भागामध्ये नित्याने होणारे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोणतेही पाऊल उचलले जात नसल्यामुळे आज अनेक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे महानगरपालिकेचा 1986 व 1995 या सालचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला हरकती सूचना झाल्या परंतु विकास आराखड्यात असलेले रस्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्यामुळे नित्याची वाहतूक कोंडी होत आहे. सध्या पुणे शहरात सर्वाधिक वाहतूक कोडी अशी नकोशी ओळख खडकवासला मतदारसंघाची होत असल्याने यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी यावेळी नगरसेवक दिलीप पाटील यांनी केली.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तसेच उपस्थित केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ व पुणे मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रमुख समस्या सोडवण्याची मागणी
- सिंहगड रस्ता उड्डाण पुलाच्या कामची गती वाढवण्यात यावी
- आंबेडकर चौकात विकास आराखड्यातील रस्ते विकसित करावे
- शिवणे -खराडी रस्ता 1986 चा विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असताना राजाराम फुल ते वारजे हा रस्ता वापरण्यात आणावा.
- बावधन येथील चांदणी चौकात पादचारी पूल होणे अत्यंत गरजेचे आहे.
- चांदणी चौक ते कोथरूड येथील मेट्रोचा हिल व्हयू कार डेपो (कचरा डेपो) या ठिकाणी मेट्रो मार्ग हा मंजूर झालेला आहे त्याचबरोबर उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे.
- वारजे मुख्य हायवे चौक विकसित करून सेवा रस्ते सुरू करण्याची गरज (शिंदे पूल ते आंबेडकर चौक रस्ता रुंदीकरण)
- चांदणी चौकातील पुलाच्या ठिकाणी पायी चालणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या.
- बावधन मुख्य रस्ता ३६ मि. असून त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी केली कारण मागील तीन-चार वर्षांपासून काम संत गतीने सुरू आहे याची अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काही अडचण असेल त्या दूर करून रस्ता तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी केली











