महाराष्ट्रात मोठी राजकीय खेळी, कोणी केली मुस्लिम आरक्षणाची मागणी? कोणाला अडचणीत आणण्याचा डाव?

0

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी अनेक अडचणींचा सामना एकाचवेळी करत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाकडून पराभवाच मंथन सुरु झालं आहे. दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने धर्मेन्द्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्रात निवडणूक प्रभारी बनवून नवीन जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देण्याची तयारी दाखवली. महाराष्ट्रात महायुतीच सरकार आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार दोघे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आरक्षणाचा हा मुद्दा शांत करण सरकारसमोरच मोठ आव्हान आहे. आतापर्यंत मराठा, ओबीसी आरक्षणाच्या विषयाचा सामना करणाऱ्या भाजपा, शिवसेना, एनसीपी सरकारसमोर आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आलाय.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मराठा आरक्षणासाठी बऱ्याच काळापासून प्रदर्शन, उपोषण आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली. आपल्या मुद्याच समर्थन करताना जरांगे पाटील म्हणाले की, “बरेच असे मुस्लिम आहेत, ज्यांचा उल्लेख कुणबी समाजाच्या कागदपत्रांमध्ये आहे” पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दल मोठ वक्तव्य केलय. त्यांचं हे वक्तव्य ओबीसी समाजाच्या अडचणी वाढवू शकतं.

या संघर्षाला अधिक धार येणार का?

मराठा समाज कुणबी आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मराठा समाजासाठी ज्या आरक्षणाची मागणी होतेय, ते ओबीसीमध्ये आहे. ओबीसी मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास आपला टक्का कमी होईल ही भीती ओबीसी समाजाला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करुन या संघर्षाला अधिक धार देण्याचा प्रयत्न केला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मुस्लिमांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरुक करु शकतात

मुस्लिमांसोबत अन्याय होऊ नये, असं जरांगे पाटील म्हणतायत. पुढच्या काही दिवसात ते मुस्लिमांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरुक करु शकतात. त्यामुळे ओबीसींच्या अडचणी आणखी वाढतील. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर आता ओबीसीमधून लक्ष्मण हाके यांनी आव्हान निर्माण केलय.

लक्ष्मण हाके यांनी काय उत्तर दिलं?

मुस्लिम समुदायाकडे लोक जाती नाही, तर धर्माच्या आधारावर पाहतात असं लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिलय. मुस्लिम समुदायातील काही जातींना आधीच ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळतय याकडे लक्ष्मण हाके यांनी लक्ष वेधलं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता