रिपब्लिकन सेना व विशाल ज्ञानसागर शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब पडांगळे, सुशिला पडांगळे, महासचिव गोविंद बनकर यांच्या अथक प्रयत्नाने मानूरवाडी, कोरबा मिठागर, दादासाहेब गायकवाड मार्ग वडाळा (पूर्व), मुंबई ३७ येथे सम्राट अशोक बुद्धविहिराचे जाहीर उद्घाटन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.






सदर प्रसंगी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर, समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, भाऊसाहेब पडांगळे, ऍड. जी. डी. घोक्षे, समाजभूषण भगवान साळवी, प्रिया गाडे-बनसोडे आदी मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, मुंबई संघटक ज्योती यादव, मुंबई महासचिव आरती घोलप, मुंबई उपाध्यक्ष राजेश शिंगरे, प्रवक्ते वसंत कांबळे, विद्यार्थी सेना मनोज गायकवाड, माजी आमदार रामभाऊ पडांगळे, सम्यक कोकण कला संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे आणि कलावंत यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.











