सुनेत्रा पवार यांना खासदारकी दिल्यावर पवार कुटुंबियांत घरणेशाही झाली का? ; छगन भुजबळ

0
1

राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. खासदार होण्यासाठी इच्छूक असलेले छगन भुजबळ पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर माध्यमांसमोर बोलताना आपण नाराज नसल्याचे ते सांगत आहेत. परंतु सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाही. काही वेळा तडजोडी कराव्या लागतात, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना तिकीट देणे म्हणजे घराणेशाही नाही का? या प्रश्नावर एका शब्दात उत्तर दिले.

काय म्हणाले छगन भुजबळ

लोकसभा लढवण्यास मी तयार झालो होतो. मला दिल्लीतून निवडणूक लढवण्याचा संदेश मिळाला होता. त्यानंतर मी तयारी सुरु केली होती. परंतु एक महिना झाल्यानंतर उमेदवारी जाहीर केली गेली नाही. यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे स्पर्धक उमेदवार एका महिन्यापासून कामाला लागले होते. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अर्ज भरण्याच्या एका दिवशीपूर्वी जाहीर झाला. त्या सर्वांचे परिणाम जय पराजय झाला, असे स्पष्टपणे छगन भुजबळ यांनी सांगितले.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

ही घराणेशाही नाही का?

राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही? यामुळे तुम्ही नाराज नाही का? त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, मला राजकारणात ५७ वर्ष झाले आहेत. अनेकवेळा आपणास वाटते की असे झाले पाहिजे झाले. परंतु नेहमी मनासारखे होते नाही. तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. त्यानंतर छगन भुजबळ यांनी दोन्ही वेळीस तुमच्यावर अन्याय का झाला? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “त्याचे उत्तर त्यांना विचारा”. पवार कुटुंबात दोन्ही पदे गेली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळणार आहे? त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी “नेक्स्ट” असे उत्तर दिले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

लोकसभा निवडणुकीत ४०० पारची घोषणा म्हणजे धोका ठरला आहे, असे आपण सांगितले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सांगत आहे. या घोषणेमुळे दलित समाज, आदिवासी समाज नाराज झाला. त्यामुळे संविधान बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. तसेच आता लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतर संघाकडून नाराजी व्यक्त होत आहे. संघाचे नाराज होणे स्वाभाविक आहे. त्याचे विश्लेषण संघाकडून केले गेले आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.