मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ महाराष्ट्रातून जातीय गणितांचा असा साधला समतोल: या नेत्यांना संधी

0
2

पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आतापर्यंत 41 जण पोहोचले आहेत. हे 41 जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देताना जातीय गणितही लक्षात घेतले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तारही आज होत आहेत. त्यासाठी 41 नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. परंतु या नेत्यांमध्ये मोदी 2 मध्ये मंत्री असलेले नारायण राणे आणि भागवत कराड यांना स्थान देण्यात आले नाही. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी 2 मध्ये नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. त्यांना यंदा मंत्रिमंडळात संधी नाही. परंतु महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

असा साधला समतोल

पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आतापर्यंत 41 जण पोहोचले आहेत. हे 41 जण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देताना जातीय गणितही लक्षात घेतले आहेत. तसेच राज्यांतील विविध भागांत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. विदर्भातून 2 मंत्री आहेत. त्यात नितीन गडकरी (ब्राम्ह्यण) प्रतापराव जाधव (मराठा) चेहरे आहेत. उत्तर महाराष्ट्रातून यंदा पराभूत झालेल्या भारती पवार ऐवजी ओबीसी चेहरा रक्षा खडसे यांना संधी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ (मराठा चेहरा) तर मुंबईतून गुजराती चेहरा पियूष गोयल यांना संधी दिली आहे. शेड्युल कास्टमधून रामदास आठवले यांना संधी दिली गेली आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती