मुंबईतील दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात माझ्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष व मुख्य प्रतोद श्री आशीष शेलारजी, वनमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, विधान परिषदेचे गटनेते श्री प्रवीणजी दरेकर, सरचिटणीस श्री रणधीरजी सावरकर यांच्यासह भाजपाचे विधानसभा व विधानपरिषदेतील सर्व सदस्य उपस्थित होते.






आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव महसूल मंत्री श्री राधाकृष्ण जी विखे पाटील यांनी मांडला. आमदार श्री संजय कुटे यांनी अनुमोदन दिले. वनमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यावर मनोगत व्यक्त केले. तसेच, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करा, अशी व्यक्त केलेली इच्छा त्यांनी मागे घ्यावी. श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच सरकार व पक्षाचे नेतृत्व करावे असा श्री आशीष शेलार यांनी ठराव मांडला. आमदार श्री नितेश राणे यांनी अनुमोदन दिले. हे दोन्ही ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.
आशीष शेलार यांनी बैठकीत ‘सद्याच्या राजकीय स्थिती व भाजपा’ या विषयावर सविस्तर भाष्य केले.
रविवारी दिल्लीत शपथविधी सोहळा सुरु होईल, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाषणातून भविष्यातील राजकीय घडामोडी व पक्ष यावर सविस्तर भाष्य करून उपस्थित सर्वांच्या भावना समजून घेतल्या आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपा आणि महायुती प्रचंड विजय मिळवेल, असा संकल्प आपण करू या, असा विश्वास सर्वांना दिला.
भाजपाला अधिक मजबूत आणि लोकाभिमुख करू
प्रिय, देवेंद्रजी विजय आपलाच आहे. भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्या सोबतीने, तुमच्या छत्राखाली आपण सगळे भाजपाला अधिक मजबूत आणि लोकाभिमुख करू असा विश्वास मी देतो.
https://x.com/cbawankule/status/1799422163801276664?t=vqvzHhsKDPG7j2nO1uOW2g&s=19











