Porsche Accident रक्ताचे नमुण्याबाबत न्यायालयात तपास अधिकाऱ्यांची मोठी माहिती; आणखी अटक होणार

0
2

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.

ज्या ठिकाणी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे, त्याच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि गटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आले आहेत. डॉ. तावरे, डॉ. हाळनौर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झालेला आहे. तसा सीडीआर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ :

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठीडत न्यायालयाने पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे.

रक्ताचे नमुने अजून शाबूत:

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्याऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे या प्रकरणात उघडकीस आले आहे. तर मुलाचे नमुने डॉ. हाळनोर याने कचराकुंडीत फेकून न देता कुणाच्या तरी ताब्यात दिले आहे. हे नमुने नेमके कुणाच्या ताब्यात देण्यात आले याचा पोलिस शोध घेत आहे, असे सरकारी वकील नितीन कोंघे यांनी नमूद केले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

ती महिला कोण?

अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ससूनमधील डॉक्टरांनी मूलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही महिला कोण आहे याचा अद्याप तपास लागलेला नाही. आम्ही या महिलेचा तपास करत असल्याची माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.

आणखी संशयीतांना अटक होणार :

कल्याणीनगरमधील गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत अनेकांचे सीडीआर तपासले आहेत. त्यातील काही संशयित आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्या विरोधात सक्षम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्यांना अटक करणार आहोत, अशी माहिती तांबे यांनी न्यायालयात दिली.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार