लोकसभा मतदान सुरू असताना पोलला परवानगी नाही निवडणुकीचे एक्झिट पोल कधी?: सविस्तर जाणून घ्या

0

भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याची 1 जून 2024 रोजी सांगता होईल. निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होणार असून, अंतिम निकालापूर्वी, एक्झिट पोलचे निकाल येणार आहेत. ज्यातून संभाव्य विजेत्यांच्या अंदाज लावाला जाईल, निवडणुका संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोल जाहीर करण्यास परवानगी आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, शेवटचे मतदान झाल्यानंतर ३० मिनिटांनी एक्झिट पोल घोषित केले जावेत. मतदान सुरू असताना ECI एक्झिट पोलला परवानगी देत नाही.

यंदा, लोकसभा निवडणूक 2024 एक्झिट पोल 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता घोषित करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

एक्झिट पोलचे निकाल वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांद्वारे घेतले जातात आणि मतदानानंतरच्या मतदारांच्या अभिप्रायावर आधारित असतात. निवडणुकीच्या विविध पैलूंबद्दल ढोबळ अंदाज घेण्यासाठी एक्झिट पोल मदतीचे ठरतात. लोकसभा निवडणूक 2024 एक्झिट पोलची तारीख आणि वेळ लोकसभा निवडणूक 2024चे एक्झिट पोल शनिवार 1 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:30 नंतर जाहीर होतील.

एक्झिट पोल 2024 चे लाईव्ह कुठे?

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज वेगवेगळ्या न्यूज चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि यू ट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले जातील. लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीची तारीख आणि वेळ लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. सर्व विजयी उमेदवारांची यादी दुपारपर्यंत निवडणूक आयोगाच्या बेवसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा