शरद पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’चा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित!

0

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दुहान राजीनामा देण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ आता सोनिया दुहानही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. मात्र दुहान यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या. मात्र आज अजित पवारांसोबत जाण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले असून सातत्याने पक्षप्रवेशाच्या बातम्या फेटळणाऱ्या सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी मागचा दरवाज्याने पोहचल्या आहेत.

धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र आज दुहान बैठकीसाठी पोहचल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहेत. कदाचीत आजच त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

शरद पवारांना मानतात गुरू

सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठकीसाठी पोहचल्या आहेत. शरद पवारांची ‘लेडी जेम्स बॉन्ड’म्हणून सोनिया दुहान यांना ओळखले जाते. सोनिया दुहान यांनी 2019 च्या निवडणुकीत महत्त्वाची भुमिका बजावली होती. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्त्व केलं. त्या एकदा राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष राहिल्या. त्यानंतर राष्ट्रीय महासचिव झाल्या. पक्षाच्या युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. शरद पवारांना आपला गुरू मानतात.

का म्हणतात ‘लेडी जेम्स बाँड’?

पहाटेच्या शपथविधी झाल्यानंतर जी कामगिरी सोनिया दुहान यांना दिली होती ती त्यांनी फत्ते केली. त्यानंतर त्या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातल्या तरुण सहकारी झाल्या असंही बोललं जातं भाजपाच्या गळाला लागलेल्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना लेडी जेम्स बाँड ही पदवी मिळाली होत. शिंदेंच्या गुवाहटीच्या बंडावेळी देखील जेव्हा आमदारांना गोव्यत आणले. त्यावेळी गोव्यातील हॉटेलमध्ये बोगस कागदपत्रं देऊन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा तो प्रयत्न फसला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची रणनिती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठक मुंबईत पार पडत आहे. अजित पवार, सुनिल तटकरेसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक होत आहे. या बैठकीला विद्यमान मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, 2024 चे लोकसभा उमेदवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थिती आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे.. तर महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राष्ट्रवादीची रणनिती ठरण्याची शक्यता आहे.