कल्याणीनगरमधील अपघाताच्या घटनेनंतर वाढलेल्या पोलिस कारवाईमुळे पुण्याच्या पूर्व भागातील पब, रेस्टॉरंटस् बारच्या परिसरात काही प्रमाणात शांतता निर्माण झाली आहे. मात्र पश्चिम भागातील बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, बाकड, भूगाव या भागातील पब, रेस्टॉरंटस् बारमध्ये अजूनही नियम पालनाचा दिखावा सुरु असल्याची सद्यस्थिती आहे. बाहेरून बंद असले तरी, आतून व्यवसाय जोरात सुरु असल्याची सद्यस्थिती आहे, मद्य विक्रीच्या नियमाबाबत मात्र व्यावसायिकांकडून कुठलीही ‘तडजोड’ होत नसल्याचेही चित्र आहे.






कल्याणीनगर येथील अपघातानंतर शहरातील पब, रेस्टॉरंटस् बार व्यावसायिकांवर पोलिस, उत्पादन शुल्क विभाग व महापालिका प्रशासनाने कारवाई केली. पोलिसांनी पव, बार व्यावसायिकांवर कारवाईला वेग देतानाच, रस्त्यावरील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करण्यावरही भर दिला आहे. त्यामुळे पुण्याच्या पूर्व भागामधील पब, रेस्टॉरंटस् बार व्यावसायिकांनी कारवाईचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे. तर पुण्याच्या पश्चिम भागातील बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट, भूगाव तसेच पिपरी-चिंचवडमधील वाकड, हिंजवडी या परिसरातही मोठ्या प्रमाणात पब, बार आहेत. हा परिसरात पहाटे तीन-चार वाजेपर्यंत तरुणाईच्या गर्दीने गजबजलेल्या स्थितीत असल्याचे चित्र होते. परंतु, अपघाताच्या घटनेनंतर पूर्व भागाप्रमाणेच पश्चिम भागावरही परिणाम दिसू लागला आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
रात्री पुणे स्टेशन, मंगलदास रस्ता, कोरेगाव पार्कमधील लेन नंबर सात, मुंढवा या ठिकाणी पोलिसांकडून पहाटेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती. ब्रेथ एनलायारद्वारे वाहनचालकांची तपासणी करणे, त्यांच्याकडील कागदपत्रे बघून नावे, मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला जात होता. रात्रगस्तीवर असलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील नाकाबंदी ठिकाणांना भेटी देऊन पाहणी करत होते.
कारवाईच्या भितीने साडेअकरा बंद
राजा बहादूर मिल परिसरात ध्वनी प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत आवाज सुरू होता. कल्याणीनगर, मुंढवा भागातील काही पब, बार कारवाईच्या भितीपोटी साडेअकरा वाजताच बंद करण्यात आले होते.
रात्री पुण्यात अजूनही हे चित्रं:-
बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट, भूगाव, वाकड, हिंजवडी या परिसरात आयटी क्षेत्रातील नोकरदार, विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या
याभागात पब, बारमध्ये तरुणांची शुक्रवार ते रविवार रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी
आता पब, बारमध्ये वेळेची मर्यादा व मद्य घेण्यासाठी मर्यादा आल्याने तरुणांचे प्रमाण कमी
काही पब, बारमध्ये अकरानंतर मद्य विक्री केली जात नसल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र मद्यविक्री सुरूच…
पब, बार बाहेरून बंद असल्याचा दिखावा, प्रत्यक्षात आतमध्ये सर्वकाही सुरळीत सूरू
पोलिस व व्यावसायिकांच्या ‘मैत्रीपूर्ण संबंधामुळे हे चित्र बदलण्याची व्यावासायिक आशावादी
प्रवेशावेळी वयाचा पुरावा, ओळखपत्र, आधारकार्डची मागणी
नोंदणीसाठी ॲप: वयाचा चुकीचा उल्लेख केला, तरीही नोंदणी ते स्वीकारले जाते
मद्य विक्रीसाठी ९ पर्यतची वेळ देण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही काही ठिकाणी मद्य विक्री सुरू
एकीकडे नियमांचे पालन केले जात असल्याचे दाखविले जातः असले, तरीही प्रत्यक्षात स्थितीमध्ये अजूनही सुधारणाची आवश्यकता
वाकड-हिंजवडीमध्ये हे सूरू आहे?
पोलिसांचा पथ व्यावसायिकांवर मोठा दबाव
ग्राहकांचे प्रमाण घटू लागल्याने व्यावसायात नुकसान
आयटी क्षेत्रात साडेदहा ते साडेबारापर्यंत पब बंद होऊ लागले
नियमांच्या पाट्या, सीसीटीव्ही लावण्यास प्राधान्य
व्यावसायात वेळेत बंद, पोलिसांची नियमितपणे पाहणी
रात्री ११ नंतर मद्यविक्री बंदचा फारसा उपयोग होत नाही
भूगाव भागातील पब आता नियमांचे पालन करू लागले
पोलिसांची नाकाबंदी, रात्रीच्या गस्तीत वाढ
तरुणांच्या टोळक्यांना सार्वजनिक ठिकाणी थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव











