रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण; शिवीगाळ करून दगड फेकून मारला गुन्हा दाखल

0
1

रस्त्याच्या आडवी लावलेली रिक्षा बाजूला लावायला सांगितल्याचा रागातून रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याचा प्रकार हडपसर येथे घडला आहे. सचिन अंबादास शेलार (वय २८) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक प्रमोद ढाकणे ( वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नियंत्रण कक्षाच्या आदेशाने हडपसर भागातील सिझन्स मॉल परिसरात रात्री नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी रस्त्यात शेलार याने रिक्षा आडवी लावली होती. पोलीस नाईक ढाकणे यांनी त्याला रिक्षा बाजूला काढण्यास सांगितले. त्यावेळी रिक्षाचालक शेलारने ढाकणे यांना धक्काबुक्की केली. त्यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारला. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप