डोंबिवलीत हाहा:कार, केमिकल कंपनीच्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू, 50 जखमी

0
2

डोंबिवली एमआयडीसी फेस 2 येथे असलेल्या अंबर केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे मोठा हाहा:कार उडाला आहे. अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास बॉयरलचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकामागेएक असे तीन मोठ्या स्फोटांचा आवाज आला. या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, कंपनीपासून दोन किमीपर्यंतचा परिसर हादरला. जवळपास दोन किमीपर्यंतची जमीन हादरली. या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. तसेच अनके घरांचे पत्र उडाले. रोडवर असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवणं हे अग्निशमन दलाच्या जवानांसाठी मोठं आव्हान आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत बॉयलर जवळ काम करत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचारी काम करत होते. त्यामुळे या स्फोटामुळे धाकधूक वाढली आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

या घटनेमुळे परिसरातील इमारती, घरे आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 50 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये परिसरातील स्थानिकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर परिसरात एका बालरुग्णालयाचं काचेचं गेटचा चक्काचूर झाला आहे. अगदी पावडर सारखं काचेचा खच रुग्णालयाबाहेर पडला आहे. सुदैवाने या घटनेमुळे कुणी जखमी झालं नाही. पण घटना खूप भीषण आहे.

तीन कंपन्या जळून खाक
डोंबिवलीतील या घटनेमुळे एमआयडीसीमधील तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. अंबर केमिकल कंपनीत स्फोट झाला. ही कंपनी जळून पूर्णपणे खाक झालीय. त्याचबरोबर या कंपनीच्या आजूबाजूच्या ओमीगा केमिकल आणि के जी केमिकल या कंपन्यादेखील जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 10 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा