रवींद्र धंगेकर यांच्या दुहेरी विनंतीचा मान आणि मुस्लिम समाजासाठी सईद अरकाटी यांची पुणे लोकसभेतून माघार

0

पुणे लोकसभा निवडणूक पुणे शहर काँग्रेसचे माजी सरचिटणीस सईद अरकाटी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता परंतु मुस्लिम समाज बांधवातील वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन व पुणे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या दुहेरी विनंतीचा मान राखत सईद अरकाटी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या समाज बांधवांमध्ये बदल शक्य असल्यामुळे आनंदाचे वातावरण असून मुस्लिम मौलाना व जमात यांच्या विनंतीचा मान राखत आपली उमेदवारी मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पुणे शहरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण मुस्लिम समुदाय एकत्र असताना मुस्लिम बांधवांच्या पाठीमागे राहावे या उद्देशाने काल पुणे शहर भागातील विविध मुस्लिम धर्मगुरूंनी काँग्रेसचे माजी सरचिटणीस सईद अरकाटी यांच्याकडे विनंती केली होती. पुणे शहरात सध्या बदलाचे वातावरण असून या वातावरणात मुस्लिम समुदायाचा मोलाचा वाटा असण्याची गरज लक्षात घेऊन निवडणूक न लढवण्याच्या निर्णय घेतला आहे. काल मध्यरात्री पुणे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलेली विनंती आणि झालेली चर्चा त्याबरोबरच सकाळी पुन्हा झालेल्या निर्णयानुसार माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पुणे लोकसभा मतदार संघामध्ये कट्टरवादी पक्षाकडून हेतूत:हा विरोधी मतांमध्ये विभाजन होण्यासाठी काही व्यवहार करून वंचित आणि MIM या दोन पक्षांची तिकीटविक्री करूनच आयात उमेदवारांना माथी मारण्याचे काम पराभवाच्या मानसिकतेतून केले आहे. वंचित समुदायाने जसे संविधान रक्षणासाठी बदलांमध्ये सहभागी होण्याचा संकल्प केला आहे त्याप्रमाणेच मुस्लिम समुदायासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ भागातून समाज हितार्थ उमेदवारीतून माघारी घेतल्याबद्दल संपूर्ण समुदाय सईद अरकाटी यांच्या निर्णयाचे स्वागत करत असून पुणे शहरात कट्टरवादी लोकांना रोखण्यासाठी एकत्र आल्याबद्दल आभार व्यक्त केले जात आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट भागात पुन्हा मध्ये माजी काँग्रेस सरचिटणीस म्हणून ….हक्काचा कार्यकर्ता पुन्हा मिळाल्याबद्दल रवींद्र धंगेकर यांनीही सईद अरकाटी यांचे स्वागत केले. धर्मांध आणि कट्टरवादी समुदायाला रोखण्यासाठी सईद अरकाटी यांचे योगदान लक्षणीय असून त्यांच्या या समाजहितार्थ घेतलेल्या निर्णयाचा पक्षाच्या वतीने कायम आदर राखण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार