पुणे लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याचा सईद अरकाटी यांनी एल्गार केल्यानंतर समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी पुणे शहरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण मुस्लिम समुदाय एकत्र आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे राहावा या उद्देशाने काल पुणे शहर भागातील विविध मुस्लिम धर्मगुरूंनी काँग्रेसचे माजी सरचिटणीस सईद अरकाटी यांच्याशी वाढता पाठिंबा लक्षात घेता माघारी घेण्यास विनंती केली आहे. पुणे शहरात सध्या बदलाचे वातावरण असून या वातावरणात मुस्लिम समुदायाचा मोलाचा वाटा असणे गरजेचे असून त्यासाठी अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती विविध धर्मगुरूंकडून केली जात आहे.






पुणे लोकसभा मतदार संघामध्ये कट्टरवादी पक्षाकडून हेतूत:हा विरोधी मतांमध्ये विभाजन होण्यासाठी काही व्यवहार करून वंचित आणि एम आय एम या दोन पक्षांची तिकीट परस्पर आयात केलेल्या उमेदवारांना देण्यात आली आहे याची जाणीव सर्व समाज बांधवांना आहे. वंचित समुदायाने जसे संविधान रक्षणासाठी यावेळेस बदलांमध्ये सहभागी होण्याचा संकल्प केला आहे त्याप्रमाणेच मुस्लिम समुदायाने ही विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी एकसंघ उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका समुदायातील धर्मगुरूंची असून त्यांच्याकडून सईद अरकाटी यांच्यावरती दबाव वाढत आहे.
पुण्यात बदल होणार असेल तर त्यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ मोठा वाटात दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळेच या भागातून आपले काम अत्यंत चांगले असून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे आहे. समाज हितार्थ आपण उमेदवारीतून माघारी घेतल्यास संपूर्ण समुदाय ही आपल्या या निर्णयाचे स्वागत केल्याशिवाय राहणार नाही; कारण पुणे शहरात कट्टरवादी लोकांना रोखण्यासाठी सर्वजण एकत्र होत असताना समाजाची भावना लक्षात घेऊन आणि समाजातील मान्यवर लोकांचा आदर ठेवून आपणही अपक्ष उमेदवारी द्वारे पुणे लोकसभा लढवण्याचा पुनर्विचार करावा अशी विनंती काल झालेल्या बैठकीमध्ये धर्म गुरूंच्या मार्फत केली असल्याची चर्चा आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट भागामध्ये महिला सुशिक्षित तरुण आणि असंघटित कामगार यांच्यासाठी आपले कार्य असून काँग्रेस सरचिटणीस म्हणून घराघरांमध्ये जनसंपर्कही आहे; ….हक्काचा कार्यकर्ता अशी पुणे कॅन्टोन्मेंट भागात झालेली ओळख धर्मांध आणि कट्टरवादी समुदायाला रोखण्यासाठी तुमचे योगदान झाल्यास समाजाला त्याचा आनंद होईल आणि त्याची जाणीव समाजही ठेवेल त्यामुळे आपण उमेदवारीचा विचार करावा असा दबाव वाढत आहे. पुणे कॅन्टोन्मेंटसह पुणे शहरातील अन्य भागातही समाज बांधवांकडून निश्चितच स्वागत केले जाईल अशी भूमिका घेण्यात आल्याची ही माहिती आहे.











