लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी… निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. एका बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. सपाचे नेते अबु आझमी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
अबू आझमी लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अबु आझमी यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार जास्त आहे. विशेषत: मुंबईतील मुस्लिम समाजाचा अबु आझमी यांना पाठिंबा आहे. अशातच जर अबू आझमी राष्ट्रवादीत गेले तर अजित पवार यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
सविस्तर बातमी लवकरच…..