सांगली लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट; या गोष्टीची ‘सल’ असेल तर आजही माघारीस तयार: चंद्रहार पाटील






एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल, तर मी उमेदवार मागे घेण्यास तयार असल्याचं वक्तव्य सांगली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे.
”फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे. मान्य आहे, माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही”, असंही ते म्हणाले आहेत. सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यामध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी जयंत पाटील, शिवसेना नेते नितीन बानगुडे-पाटीलही मंचावर उपस्थित होते.
चंद्रहार पाटील म्हणाले की, ”शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेलो असतो उद्धव ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. मिरज येथे उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली, तिथे दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली. तिसऱ्यांदा पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. चौथ्यांदा महाविकास आघाडीच्या पत्रकात माझ्या उमेदवारीची घोषणा झाली.”











