होय, मी भाजपमध्ये जातोय, एकनाथ खडसे यांची माहिती! आजच प्रवेश होणार? शरद पवार काय निर्णय घेणार

0
1

एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार असून लवकरच ते भाजप प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल.

मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आहेत. तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार हे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र जळगावातील भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मात्र त्याला सातत्याने नकार दिला होता. मात्र आता एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपवासी होणार असल्याची माहिती समोर आल्याने गिरीश महाजन काय करणार हे पाहावं लागेल.