पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारतानं केलेल्या एअर स्टाईकमध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर मिसाई हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला. त्यानंतर भारतानं प्रत्यु्त्तर म्हणून केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसानं झालं, पाकिस्तानचे अनेक एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली. दरम्यान आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, मात्र जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, ते सर्व उद्देश पूर्ण झाल्याचं भारतानं म्हटलं आहे.






भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तामध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला, या हल्ल्यामध्ये 9 दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त करण्यात आले. 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारतानं केलेल्या या कारवाईमुळे देशाची तीन प्रमुख धोरणात्मक उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य झाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई पाकिस्तानला लष्करी, राजकीय आणि मानसिक आघाड्यांवर योग्य प्रत्युत्तर असल्याचे सिद्ध झाली आहे.
दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांना आणि पाकिस्तानला कडक इशारा दिला होता, आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा करू असं म्हटलं होतं. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अचूक एअर स्ट्राईक करून पाकिस्तानमधील बहावलपूर, मुरीदके आणि मुझफ्फराबाद सारख्या ठिकाणी असलेले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
राजकीय आघाडी
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी जल कराराला स्थगिती दिली, दरम्यान आता जरी युद्धविराम झाला असला तरी देखील जोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरू राहातील तोपर्यंत सिंदू नदी जल कारारावरची स्थगिती कायम राहील असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, यातून भारताची कुटनीती दिसून येते.
पाकिस्तानवर मानसिक दबाव
भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भाराताच्या ताकदीची कल्पाना पाकिस्तानला आली आहे, भारत आपल्या घरात घूसून हल्ला करतो हे पाकिस्तानला कळून चुकलं आहे, त्यामुळे हा पाकिस्तानवर मोठा मानसिक दबाव असणार आहे.











