कोलवडी : पूर्व हवेली तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोलवडी-साष्टे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश मदने यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी मदने यांनी कोलवडी गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प ग्रामपंचायत कार्यालयात केला.
मावळत्या उपसरपंच शितल अविनाश भाडळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या उपसरपंच पदाच्या रिक्त जागेची निवडणूक कोलवडी-साष्टे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास आधिकारी प्रविण खराडे यांच्या आधीपत्याखाली निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये उपसरपंच पदासाठी रमेश मदने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
मुख्यत्वे मला सदस्य पदी निवडूण दिलेले सर्व मतदार ग्रामस्थ तर परिवर्तन पॅनलचे सर्व पॅनेल प्रमुख,सरपंच विनायक गायकवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदत व सहकार्यामुळे कोलवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचा मी आभारी असून यापुढे गावचा सर्वांगीण विकास साधत कोलवडी गाव जिल्ह्यात आदर्श बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनियुक्त उपसरपंच रमेश मदने यांची पारंपारीक वाद्यात,गुलाल,भंडाऱ्याची उधळण करीत फटाक्यांच्या अतिषबजित कोलवडी गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास गायकवाड,अशोक गायकवाड,मिलापचंद गायकवाड,जयसिंग गायकवाड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड,सरपंच विनायक गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.प्र
याप्रसंगी माजी सरपंच सतिश गायकवाड,मारूती मदने,माजी उपसरपंच बाळासाहेब भाडळे,दिलीप गायकवाड,म्हस्कु गायकवाड,विकास कांचन,शंकर मदने,अशोक गायकवाड राजू गायकवाड,शरद गायकवाड,अमर गायकवाड,उत्तम जगताप,विलास भोसले ,नाना मुरकुटे,पंकज गायकवाड,काळुराम गायकवाड,विश्वास गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड,निलेश रिकामे,संदिप गायकवाड,स्वप्निल नितनवरे,चैत्राली गायकवाड,स्वाती गायकवाड,निशा भोर, प्रिया गायकवाड आदी पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.