रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा! जात पडताळणी समितीच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती…

0
1

नागपूर येथील काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी प्रकरणी हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. नागपूर खंडपीठानं जिल्हा जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली असून जात प्रमाणपत्राची वैधता मान्य केली आहे. याप्रकरणी २२ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. रश्मी बर्वे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतू जात पडताळणीत त्या अपात्र ठरल्यानं त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी रद्द ठरवली होता. पण आता त्यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असला तरी त्यांना निवडणूक मात्र लढवता येणार नाही.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

हायकोर्टानं या प्रकरणी कुठल्याही प्रकरणी आदेश दिलेला नसला तरी आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहोत, असं रश्मी बर्वे यांनी सांगितलं आहे. मागच्या पाच वर्षांपासून ज्या नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात होतं त्या राणांच्या जात प्रमाणपत्रावरील हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली.

यावरुन सरकारवरही त्यांनी निशाणा साधला आणि म्हणाल्या, “मग सरकार कोणाचं आहे? ज्यांच्याकडं पैसा आहे, धनदौलत आहे त्यांच्या बाजून सरकार उभं राहतं हे दिसून आलं आहे”