शैलेंद्र पवार यांचा बौद्धजन सहकारी संघाच्या विभागाच्या वतीने जाहीर सत्कार

0

मुंबई: बौध्दजन सहकारी संघ प्रणित नियोजित बौध्दजन सहकारी पतसंस्थेचे प्रवर्तक आयु. शैलेंद्र पवार साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी शासन प्रमाणित लेखा परीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच बौद्धजन सहकारी संघ या आपल्या मातृतुल्य संघाच्या पुढील आर्थिक व्यवहाराच्या अहवाल संदर्भात अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल बौध्दजन सहकारी संघ विभाग क्र. ७ व विभाग क्र. १ च्या वतीने आयु. शैलेंद्र पवार यांना त्यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व यांचे अभिनंदन करून त्यांना संघाच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

सदर सदिच्छा भेटीस बौद्धजन सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष तथा विभाग क्र. ७ चे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र जाधव साहेब, विभाग क्र. ७ चे विद्यमान विभाग अधिकारी आयु. सचिनजी गमरे गुरुजी, विभाग क्र. ७ चे माजी विभाग अधिकारी आयु. पांडुरंग गमरे साहेब, विभाग क्र. ७ चे विद्यमान अध्यक्ष आयु. शरदजी यादव तसेच विभाग क्र. १ चे विद्यमान विभाग अधिकारी आयु. संतोषजी कदम यांनी उपस्थिती दर्शविली.