भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी ‘युवा स्वाभिमान पार्टी’चा राजीनामा दिला. या पक्षाचे संस्थापक रवा राणा यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद, अमरावतीत विजय भाजपचाच होणार आहे, असं नवनीत राणा यांना म्हटलं. मात्र त्यांच्या उमेदवारी बच्चू यांनी कडाडून विरोध केला आहे.
बच्चू कडू यांचा कडाडून विरोध
नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी मान्य नाही. त्यांचा प्रचार मी करणार नाही. तर त्यांचा परभव करणार, असं बच्चू कडू म्हणाले. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही. आता तर उमेदवारी जाहीर झालीय. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आपण सगळं व्यवस्थित करू. एकतर दुसरं कुणाला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून नवनीत राणा यांना पाडता येतं का? किंवा दुसऱ्या एखाद्या सक्षम उमेदवाराला समर्थन देऊन नवनीत राणा यांना पाडता येतं का? या गोष्टींचं नियोजन सुरु आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
रवी राणांची विनंती
नवनीत राणा या आधीपासूनच एनडीएसीबत आहे. आम्ही एनडीए सोबत आहेत. त्यांची आमची विचारधारा एक आहे. नवनीत राणा यांनी मोदीजी च्या नेतृत्वात काम केलं आता त्यांचा भाजप प्रवेश झाला. त्या 3 लाखाच्या वर मताधिक्य घेऊन विजयी होतील. बच्चू कडू यांनी विरोध व्यक्त केला, त्यांना हात जोडून विनंती करतो की सुदधा एनडीएचा घटक आहे. सगळे मिळून काम करतील. जिल्ह्याच्या विकासासाठी पाठिंबा द्यावा, असं रवी राणा म्हणाले.
नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवनीत राणा काल रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस बावनकुळेजी हे आमच्यासोबत नेहमी आमच्या पाठीशी राहून त्यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. आमच्यासारख्या नवीन माणसाला तिकीट देणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. आमच्या अमरावतीकरांची सून लक्ष्मीच्या हाती कमळ यावं असं अमरावतीकरांचा स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम भाजपने केलं आहे, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.