महाविकास आघाडी तर्फे पुणे महापालिका आयुक्तांविरोधात निषेध आंदोलन; मुख्य नागरिक समस्यांकडे हेतू:हा दुर्लक्ष… 

0

आपल्या पुणे शहरातील वारजे जकात नाका येथे असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होणारी वाहतूक कोंडी कायमची झाली असून यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय हा कळीचा मुद्दा बनला आहे. पुणे मनपाच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात या ज्वलंत विषयाला हात घालून त्यावर उपाययोजना करणे हे पुणे महानगरपालिकेतील प्रशासकाकडून व सत्ताधाऱ्यांकडुन अपेक्षित होते. कारण याबाबत आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्फत महाविकास आघाडीचे माजी लोकप्रतिनिधिंचा वारंवार गेल्या सहा महिन्यापासून माननीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा चालू होता.

या अर्थसंकल्पात (सन २०२४ – २०२५) सदर चौकातील उड्डाणपुलासाठी भरीव तरतूद अपेक्षित असताना मनपाच्या प्रशासकाकडून मात्र शून्य तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ही समस्या निवारीत होणार नसून अधिकच भयावह बनणार आहे. प्रशासकाच्या व सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात काल पुणे शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी एकत्र येत आवाज उठवला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे आणि पुणे शहराध्यक्ष आदरणीय श्री. प्रशांतदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवत येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सदर चौकात लवकरात लवकर भरीव तरतूद करूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतुकीच्या दृष्टिकोनातून योग्य असा उड्डाणपूल झाला पाहिजे याकरिता हे आंदोलन घेण्यात आले. यासाठी उपाययोजना न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेविका सायली वांजळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कार्याध्यक्ष सुरेश गुजर, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, शुक्राचार्य वांजळे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष किशोर कांबळे, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी जगदीश दिघे, नितीन वाघ, शाम मोरे, भरत गोगावले, कोथरूड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी विष्णू सरगर, दीपक चांदगुडे, विनायक देशमुख, कमलाकर गुंजाळ, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष ज्योतीताई सूर्यवंशी व त्यांच्या सहकारी पदाधिकारी, प्रभागाचे अध्यक्ष किशोर शेडगे, विधानसभेचे पदाधिकारी महेश कनेरकर, अतुल खसे याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व आम आदमी पार्टीचे सन्माननीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आंदोलनाचे नियोजन माजी नगरसेवक सचिन दोडके व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी केले होते.