पवार कुटुंबात फूट? राज ठाकरे म्हणाले, ‘आतून सगळे एकच…’ राष्ट्रवादी पक्ष नसून निवडून येणाऱ्या माणसाची… 

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा करत आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी त्यांनी पवार कुटुंबीयांबाबत एक मोठा दावा केला असून, याने राजकीय वर्तुळात चर्चा झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार गट आतून एकच असल्याचा दावा केला आहे. शरद पवार आणि अजित पवार गट बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच आहेत, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आपल्या भाषणात सर्वच राजकीय पक्षांना लक्ष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते माझी भेट घेण्यासाठी आले होते. त्यांना कोणत्या गटाचे म्हणून विचारले असता, त्यातील तीन शरद पवार, दोन अजित पवार गटाचे असल्याचे समजले. मात्र, ते भेटायला एकत्र आले होते. यावरून माझे ठाम मत आहे, हे सर्व आतून एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर विरोधक नेहमी एक आरोप करत आहेत. तो म्हणजे, सुरुवात करतात शेवट करत नाही. विरोधकांच्या या आरोपांना आज त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक होणार होते ते अजून का झाले नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फुलं वाहून गेले, त्या फुलांंचं काय झालं. पण त्या वेळेत वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.

ते म्हणाले, ज्याप्रमाणे मनसे सुरुवात करते तसा शेवटही करते. आमची भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक होती आहे. मनसेने प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले आणि भोंग्यांचा आवाज बंद झाला. हे सरकार डरपोक आहे. मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. माझ्या हातात सरकार द्या सर्व भोंगे काढतो. समुद्रात दर्गा बांधला, तो एका रात्रीत काढला. प्रार्थना करू नको असे आम्ही म्हणतो का, एका जातीचा प्रश्न नाही, प्रत्येक राज्यातील जातींचा प्रश्न आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा