पुणे लोकसभा लढवणार का? वसंत मोरेंच्या विधानानं नवा ट्विस्ट

0
1

पुणे लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले असून, सध्या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचेही दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे पुण्यातील धडाडीचे नेते वसंतराव मोरे यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. मनसे पक्षाचा आज वर्धापन दिन असून, त्यानिमित्त नाशिक येथे आयोजित कार्यक्रमाला वसंतराव मोरे आवर्जून उपस्थित राहिले आहेत.

वसंत मोरे यांनी याबाबत व्हाॅट॒सॲप स्टेटस ठेवले असून, त्यातून मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांत चर्चेला उधाण आले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक मी लढण्यास तयार असून, राज ठाकरे यांनी मला संधी दिली, तर मनसेचा पहिला खासदार पुण्यातून होण्याचा मान मिळवेन, असे वसंतराव मोरेंनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  कर्वेरोड सार्वजनिक गणेश विसर्जन नियमित वेळेतच; सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समितीचे बहुमूल्य योगदान

ते म्हणाले, मनसेचा वर्धापन दिन नाशिकात साजरा होत असताना येथील राज ठाकरेंच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नुकताच पुणे दौऱ्यात बोलताना साईनाथ बाबर यांना मोठी संधी देण्याचे सूतोवाच केले होते.

यानंतर आता वसंत मोरे यांनी ठेवलेल्या व्हॉट्स॒ॲप स्टेटस॒मुळे चर्चेला उधाण आले आहे. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांतच मोरेंनी अशा पद्धतीने स्टेटस॒ ठेवल्याने खळबळ उडाली आहे. कुणसाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच. पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्यवेळी सगळी गाणी वाजवणार, हा संदेश नेमका कोणाला यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय