वनाझ परिवार शिवमंदिर महाशिवरात्री उत्सव २०२४; नऊ नवदुर्गांचा सन्मान

0

वनाझ शिवशंभो सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून मंदीरात दुग्धाभिषेक, रुद्र महायाग सुरू होणार असून सकाळी ठीक ९ वाजता पालखी सोहळा संपन्न होईल. दुपारी ठीक १२ वाजता पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात येईल तर सायंकाळची आरती शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज दादा सुतार यांच्या शुभहस्ते ८ वाजता संपन्न होईल. रात्री ठीक ११ वाजता उसाच्या रसाचा अभिषेक व भस्म आरती होणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वाजता हभप.विनायक महाराज निघोट यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर ११ ते ४ वाजेपर्यंत सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याकारणामुळे याशिवरात्री महोत्सवा अंतर्गत कोथरूड परिसरातील विविध क्षेत्रातील नऊ महिला भगिनींचा म्हणजेच नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष संजय काळे यांनी दिली. मंदिर आणि मंदिराच्या परिसरात करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई हे या महाशिवरात्र उत्सवाचे वैशिष्ठ आहे. या शिवरात्री उत्सवाला दरवर्षी पुण्यातील कला क्रीडा शैक्षणिक तथा राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर आवर्जून उपस्थित असतात.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

तरी कोथरूड आणि पुण्यनगरीतील सर्व शिवभक्तांनी या महाशिवरात्री उत्सवाला भेट देऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यावे असे आवाहन ट्रस्ट च्या वतीने कार्याध्यक्ष दीपक कुल यांनी केले आहे.
उत्सव प्रमुख युवराज गायकवाड, श्याम सुर्वे, बाबासाहेब गायकवाड, विकास जाधव, महेश यादव, यतीन घरत, मिलिंद देशपांडे, जनार्दन सातपुते, विकास पंदिरे, संतोष बाईत, केदार घाटे आणि विनायक पवार यांनी या महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले आहे.