भाजपा आमदाराच्या पुतण्याची भर बाजारात निर्घृण हत्या, 6 गोळ्यामुळे नीरजचा मृत्यू; परिसरात हत्येनंतर तणाव

0
1

भाजप आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान यांची बिहारमधील कटिहारमध्ये आज(बुधवारी) सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अज्ञातांनी नीरज पासवान यांच्यावर गोळ्या झाडल्या.

घटनेनंतर नीरजला जखमी अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एएसपी शशी शंकर कुमार, शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख सुमन कुमार सिंग यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठले आणि छापा टाकून एका आरोपीला अटक केली. तसेच, शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

मृत नीरज पासवान यांचा मृतदेह कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. नीरज पासवान हा रेल्वे कर्मचारी दिनेश पासवान यांचा मुलगा आणि कोडा येथील भाजप आमदार कविता पासवान यांचा पुतण्या आहे. स्थानिक लोक या घटनेचा संबंध महापौर शिवराज पासवान यांच्या हत्येशी जोडत आहेत. याप्रकरणी पोलीसांकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

नीरज पासवान बुधवारी सकाळी ड्रायव्हर टोला येथील घराजवळ होते. त्यानंतर अचानक दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. 6 गोळ्या लागल्याने नीरजचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नीरज जिवंत असल्याचे समजून स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे