शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती १८ हजार ऑडिओ क्लिप; ६ क्लिप संशयास्पद

0

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींना ७ दिवसाची मोक्का कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्या मोबाईलमधून महत्त्वपूर्ण ६ ऑडियो क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत. त्या ऑडियो क्लिपमधून धागेदोर समोर येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पुणे पोलिसांनी न्यायालयात वर्तविली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणाशी संबंधित सात गाड्या आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, मुन्ना पोळेकरसह इतर आरोपींना ७ दिवसांची मोक्का कोठडी मिळाली आहे.

काही ऑडिओ क्लिप संशयास्पद

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस चौकशीत महत्वाची माहिती समोर आली होती. शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला ६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती.

शरद मोहोळ हत्या प्रकरणाशी संबंधित पोलिसांच्या हाती १८ हजार ऑडिओ क्लिप लागल्या होत्या. याऑडिओ क्लिप आरोपींच्या फोनमधून सापडल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ क्लिप संशयास्पद असल्याचं सांगितलं आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शरद मोहोळवर गोळीबार

शरद मोहोळवर ५ जानेवारी रोजी काही लोकांनी गोळ्या झाडल्या होत्या. ही घटना कोथरूड परिसरात घडली होती. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हा गोळीबार केला होता. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे पोलिसांच्या ताब्यात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

शरद मोहोळ  हत्या प्रकरणामध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आता याप्रकरणातील अभिजीत मानकर, गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांनी मोहोळच्या खूनापूर्वी एक महिना आधी बैठक झाली असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. पोलीस याप्रकरणाचा तपास वेगाने करत आहेत.