१३६ दिवसांनंतर केलं कमबॅक ! इंडिया नेत्यांच्या जयघोषात राहुल गांधींची लोकसभेत ग्रँड एंट्री!

0

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. तब्बल 136 दिवसांनंतर ते आज संसदेत आले आहेत. मोदी आडनाव प्रकरणी दोन वर्षांच्या शिक्षेनंतर 24 मार्च रोजी खासदार पद गेले होते. 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. तीन दिवसांनंतर त्यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. राहुल गांधींची लोकसभेत ग्रँड एंट्री झाली आहे. काँग्रेस नेत्यांसह इंडिया नेत्यांच्या जयघोषात जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

राहुल गांधी संसद भवनाच्या आवारात आल्यानंतर फक्त काँग्रेस नेतेच नाही, तर विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. राहुल गांधी संसदेत दाखल झाले त्यानंतर काँग्रेस खासदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सुध्दा त्यांचं स्वागत केलं आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींचे खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांना लोकसभा सचिवालयाकडून संसदेतील सदस्यत्व बहाल करण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. आता चार महिन्यानंतर संसदेत दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षाकडून एकच जल्लोष करण्यात आला आहे.

राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून यासंबधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची लोकसभेच्या सचिवालयाकडून आज (सोमवारी) पडताळणी केली. त्यानंतर खासदारकीबद्दल अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा