मंत्रिपदाच्या रेसमधील आमदार थोडक्यात बचावले, पोलीस व्हँननेच दिली धडक

0
1

जळगाव : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनानंतर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता. मात्र, अजित पवार यांच्यासह आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप आमदारांच्या मंत्रिपदाची संधी हुकली. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्यासह जळगावचे आमदार चिमणराव पाटील ही नावे चर्चेत होती. यातील शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

चिमणराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघातुन निवडून आले आहेत. अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडी जवळ हा अपघात घडला. आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा रक्षकांच्या पोलीस व्हॅनने त्यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात चिमणराव पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, पोलीस व्हॅन आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या कारचे नुकसान झाले आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार