रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेला अपघात अगदी ताजा असतांनाच आता पुणे जिल्ह्यात अशी घटना घडते कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पुण्यातील भिमाशंकर येथेही तशीची काहीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भिमाशंकरच्या डोंगर कड्यावरील पदरवाडी येथील डोंगराला भेगा पडल्या आहेत. अधिक माहिती अशी कि, डोंगर कड्याला ३०० मीटरपर्यंत भेगा पडल्या आहेत. यामुळे दरवाडी गावच्या १५ कुटुंबातील ८० जणांचा जीव टांगणीला लागला असून १०० हून आधिक जनावरांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
पदरवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे डोंगर कडा कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अप्पर तहसीलदार नेहा शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली.पदरवाडीचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी आता केली जात आहे.